‘शिंदे फक्त 5 आमदारांसोबत आले असते तरी…’, भाजप नेत्याचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

sudhir mungantiwar big statement on cm eknath shinde devendra fadnavis maharashtra politics
sudhir mungantiwar big statement on cm eknath shinde devendra fadnavis maharashtra politics
social share
google news

Maharashtra Political News : मी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष सरकार चालवले असले तरी, एकनाथ शिंदे यांना मी बॉस म्हणून स्विकारले आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेस आयडिया ऑफ एक्सचेंज कार्यक्रमाच्या मुलाखतीत केले आहे. फडणवीसांच्या या विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बॉस या विधानावर आणि मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. (sudhir mungantiwar big statement on cm eknath shinde devendra fadnavis maharashtra politics)

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद आहे, असा आभास निर्माण केला जातो. हे अतिशय चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा, भाजपचा आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा आहे, यात कोणतीच शंका नाही, असे मोठे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत मुनगंटीवार बोलते होते. याचसोबत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतूकही केले आहे.

हे ही वाचा : ‘एकनाथ शिंदे माझे ‘बॉस’, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण ठरवणार?

एकनाथ शिंदे हिंदुत्वासाठी सत्तेला पाठ फिरवून भारतीय जनता पार्टीसोबत आले होते. पण काही लोक मुख्यमंत्री पदासाठी आल्याचा गैरसमज पसरवतात. मुख्यमंत्री हे शिंदेना करायचं हे कुठेही ठरलेले नव्हते, असे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडताना शिंदेच्या मागे 40 आमदार आले नसते, फक्त 5 आमदारचं आले असते. तरी एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा त्याग केला होता, नगरविकास सारख्या मोठ्या खात्याचे ते मंत्री होते. ते मंत्रीपद सोडून आले होते. त्यामुळे विरोधी पक्षातून सत्तेत जाण्याची अनेक कारणे आहेत.पण सत्तेतून विरोधी पक्षात जाणे, हे प्रवाहाविरूद्ध लढण्याचा पराक्रम हा दिलदार आणि पराक्रमी व्यक्तीच करू शकतो, असे कौतुक देखील सुधीर मुनगंटीवार यांनी मु्ख्यमंत्री शिंदे यांचे केले आहे.

हे वाचलं का?

सुधीर मुनगंटीवार यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी त्यांचा वाद, त्यांचा बंड, यात भाजप-शिवसेनेचे काहिच देणे-घेणे नाही.तसेच देव जे करतो, ते चांगलेच करतो,असे कधी कधी या घटनेतून वाटते असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. आषाढी एकादशी आहे, भगवान विठ्ठल त्यांच्यामध्ये (अजित पवार) असणारा असंतोष असाच ठेवो आणि भाजप-शिवसेना युतीचे सरकार वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी असेच अनेक वर्षे ठेवो, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणूका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे विधान देंवेंद्र फडणवीसांनी केले होते. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्या जातील असे विधान केले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : कल्याण लोकसभा मतदारसंघावर हक्क कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT