Shiv Sena UBT: “मोदींची मुक्ताफळे देशाची बदनामी नव्हती तर काय?”
Shiv Sena UBT, BJP, Narendra Modi : शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलं आहे. विरोधी पक्षानी नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत आणि राहुल गांधी यांच्या केब्रिंजमधील विधानाचा हवाला देत ठाकरेंनी मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. सामना अग्रलेखात शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे की, “देशातले वातावरण कधी नव्हे इतक्या गोंधळाचे […]
ADVERTISEMENT
Shiv Sena UBT, BJP, Narendra Modi : शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलं आहे. विरोधी पक्षानी नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत आणि राहुल गांधी यांच्या केब्रिंजमधील विधानाचा हवाला देत ठाकरेंनी मोदी आणि भाजपवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
सामना अग्रलेखात शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे की, “देशातले वातावरण कधी नव्हे इतक्या गोंधळाचे आहे. कालपर्यंत स्वायत्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक सरकारी यंत्रणांचे भाजपने खासगीकरण करून टाकले आहे. हा धोका अल कायदा, तालिबानपेक्षा भयंकर आहे. निवडणूक आयोग तर भाजपच्या ताटाखालचे मांजर होऊन सत्ताधाऱ्यांच्या दारात शेपटी हलवत बसला आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयास निवडणूक आयोगाच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावा लागला व मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली. भाजपच्या मनमानीस दिलेली ही चपराक आहे.”
Shiv Sena ची स्थापना निवडणूक आयोगाच्या नाही, माझ्या वडिलांनी केली : ठाकरेंनी ठणकावलं
हे वाचलं का?
भाजपचे पोपटराव… शिवसेनेचं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टीकास्त्र
“राहुल गांधी यांचे केंब्रिज विद्यापीठातले भाषण सध्या गाजते आहे. गांधी यांच्या फोनमध्ये ‘पेगॅसस’ सोडून त्यांचे फोन ऐकले जात होते. या हेरगिरीसाठी जनतेचाच पैसा वापरून इस्रायलमधून यंत्रणा खरेदी केली. या सगळ्याचा स्फोट गांधी यांनी केंब्रिज येथे केला. त्यामुळे देशाची बदनामी झाल्याचा ‘राग’ भाजपच्या पोपटरावांनी आळवला. मग मोदी आतापर्यंत परदेशात जाऊन पंडित नेहरूंपासून इंदिराजी, राजीव गांधी व त्यांच्या सरकारबाबत जी मुक्ताफळे उधळत होते ती देशाची बदनामी नव्हती तर काय होते? आज देशात जी हुकूमशाही राजवट सुरू आहे, त्यामुळे लोकशाहीचा मुडदाच पडलेला दिसतो”, अशी टीका शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे.
Sanjay Kadam : पक्षप्रवेशाला ठाकरे उपस्थित; दापोलीत कसं बदलणार राजकारण?
ADVERTISEMENT
मोदींच्या वल्गना, भ्रष्ट व्यवस्था… सामना अग्रलेखात काय?
“कर्नाटकातील भाजप आमदार मडल विरुपक्षप्पा यांच्या घरात आठ कोटी रुपये ‘रोख’ घबाड सापडले. हे इतके मोठे ‘कॅशकांड’ होऊनही ईडी, सीबीआय भूमिगत आहेत. मोदी हे भ्रष्टाचारमुक्त शासनाच्या वल्गना करतात. सगळ्यात भ्रष्ट शासन व्यवस्था त्यांचीच आहे. याच आमदार मडल यांच्या चिरंजीवांना लाखोंची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली, पण त्यावर भाजपवाले बोलायला तयार नाहीत. भाजपने भ्रष्ट मार्गाने हजारो कोटी रुपये कमावले व ते ‘अदानी’ यांच्या माध्यमातून गुंतवणूक करून काळ्याचे पांढरे केले. त्या गुप्त व्यवहारात एलआयसीपासून राष्ट्रीयीकृत बँकांपर्यंत सगळेच बुडाले हे आता स्पष्ट झाले. भारतीय जनता पक्षाने देशाची लूट केली व चौकश्यांचा ससेमिरा मात्र विरोधकांच्या मागे लावला”, अशी टीकाही सामना अग्रलेखातून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT