Lok Sabha 2024 : 'वंचित'चे तीन उमेदवार ठरले? आंबेडकरांनी केला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीच्या वेगवेगळ्या उमेदवारांची चर्चा जोरात सुरू आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली.

social share
google news

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seat Sharing :  प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. प्रकाश आंबेडकरांकडून सातत्याने वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. त्यातच आता तीन संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत. याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी दबावतंत्र सुरू असल्याचे दिसत आहे. 

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची चर्चा सुरू झाल्यापासून प्रकाश आंबेडकर वेगवेगळे प्रस्ताव आणि भूमिका मांडताना दिसत आहे. आम्ही अजूनही मविआमध्ये सामील झालेलो नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहे. अकोला येथून प्रकाश आंबेडकर, वर्धा येथून प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून पहेलवान चंद्रहार पाटील यांचे नाव चर्चेत आहे. याबद्दल त्यांनी खुलासा केला. प्रकाश आंबेडकर (३ मार्च) यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आणि तीन उमेदवारांच्या नावांबद्दल भूमिका मांडली. आंबेडकर काय म्हणाले बघा व्हिडीओ...

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT