Mood of the Nation नंतर महाराष्ट्रातील लोकसभा जागांबद्दल संजय राऊतांचा मोठा दावा
Mood of the Nation Maharashtra: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी 26 नाही तर 35 जागांवर विजय मिळवेल असा दावा शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Mood of the Nation Maharashtra: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी 26 नाही तर 35 जागांवर विजय मिळवेल असा दावा शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
Mood of the Nation 2024 and Sanjay Raut: मुंबई: इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन'मध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबाबत जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार, राज्यातील 48 जागांपैकी केवळ 22 जागा या भाजपसह महायुतीला मिळतील तर 26 जागा या महाविकास आघाडीला मिळतील. याच सर्व्हेनंतर शिवसेना (UBT) चे नेते संजय राऊत यांनी मुंबई Tak ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. ज्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीला (MVA)तब्बल 35 जागा मिळतील असा दावा केला आहे. (shiv sena ubt sanjay raut big claim about lok sabha seats in maharashtra after mood of the nation said mahavikas aghadi will win 35 seats)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले...
'आम्ही 35 जागा जिंकणार...'
मूड ऑफ द नेशन या सर्व्हेवर बोलताना शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, 'महाविकास आघाडी एकत्रितपणे 48 पैकी 35 जागा जिंकणार आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आम्ही सर्व मिळून 30 ते 35 जागांच्या पुढे जाऊ.'
हे ही वाचा>> MOTN 2024 : महाराष्ट्रात भाजपला बसणार झटका! झोप उडवणारा पोल?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना हे एकत्र लढले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच एकूण 41 जागांवर भाजप-शिवसेनेने विजय मिळवला होता. यावेळी भाजपला 28 टक्के तर शिवसेनेला 23 टक्के मते मिळाली होती. एकूण 51 टक्के मतं युतीला राज्यात मिळाली होती. मात्र, 2022 साली शिवसेनेत फूट पडल्यानंतर 12 खासदार हे शिंदे गटात गेले तर 6 खासदार हे उद्धव ठाकरे गटात राहिले.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातील गेल्या निवडणुकीची आकडेवारी
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी एनडीएने 2019 च्या निवडणुकीत 41 जागा जिंकल्या. त्यापैकी 23 जागा भाजपने, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. तेव्हा शिवसेना हा एकसंध पक्ष होता. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीमध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी 5 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीला चार, तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. तर औरंगाबादमध्ये ओवेसींच्या पक्ष AIMIM चे उमेदवार इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता.
हे ही वाचा>> Shiv Sena : मुंबईत ठाकरे गटाला मोठा झटका
महाविकास आघाडीला किती मिळू शकतात?
ADVERTISEMENT
मूड ऑफ द नेशनच्या पोलनुसार, महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाली, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला 26 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना मिळून 14 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस 12 जागा जिंकू शकते. म्हणजे महाविकास आघाडी राज्यात 26 जागा जिंकू शकते, असा अदांज मूड ऑफ द नेशन सर्वेमधून व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT