Ganpat Gaikwad: ‘हो झाडल्या मी गोळ्या…’, जाहीर कबुली देणारे आमदार गणपत गायकवाड आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

who is the bjp mla ganpat gaikwad who firing on shiv sena leader mahesh gaikwad know his profile
who is the bjp mla ganpat gaikwad who firing on shiv sena leader mahesh gaikwad know his profile
social share
google news

Ganpat Gaikwad Profile: कल्याण: भाजप आमदाराने काल थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार करत शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला केला. एक नाही, दोन नाही तब्बल सहा गोळ्या त्यांनी झाडल्या. महत्वाचं म्हणजे या गोळ्या भर पोलीस ठाण्यात झाडल्या गेल्या. त्याहूनही महत्वाचं म्हणजे या गोळ्या कुठल्या गुन्हेगारानं नाही तर सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी झाडल्या. त्यांनी हा गोळीबार का केला?, ज्या भाजप आमदारानं हा गोळीबार केला ते गणपत गायकवाड नक्की कोण? हे सगळं जाणून आपण सविस्तर जाणून घेऊयात. (who is the bjp mla ganpat gaikwad who firing on shiv sena leader mahesh gaikwad know his profile)

ADVERTISEMENT

कल्याण पूर्वमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. हा जीवघेणा हल्ला भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतः केला आहे. या हल्ल्यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून, महेश गायकवाड यांचे मित्र आणि शिंदे समर्थक राहुल पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आता हा गोळीबार का केला गेला तर यावर स्वत: ज्यांनी हा गोळीबार केला ते म्हणजे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘हा गोळीबार मीच केला..’ असं म्हणत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Ganpat Gaikwad: ‘हा गोळीबार नाही.. शिंदे-फडणवीसांमधील गँगवार’, सुषमा अंधारेंच्या विधानाने खळबळ

गणपत गायकवाड म्हणाले.. “पोलीस ठाण्याच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्ती कब्जा केला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मी स्वत: गोळी झाडली. मला काही पश्चात्ताप नाही. कारण माझ्या मुलांना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी काय करणार?”,अशी पहिली प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली.

“मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळून ठेवले आहेत. त्यांनी दुसऱ्याचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे”, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. या दोघांमध्ये सातत्याने राजकीय शीतयुद्ध रंगलेलं आतापर्यंत अनेकदा बघायला मिळालं. याच शीतयुद्धाचा भडका अखेर उल्हासनगरमध्ये उडाला.

ADVERTISEMENT

पोलीस स्टेशनमध्ये नक्की काय घडलं?

उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड पोहोचले होते. त्यांच्यात जमिनीचा वाद होता. गेल्या काही दिवसांत वाद विकोपाला गेला. हाच वाद सोडवण्यासाठी शुक्रवारी महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात गेले होते. तिथेही वाद शमला नाही आणि गणपत गायकवाड यांनी थेट महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या.

आता पोलिसांमोरच गोळ्या झाडणारे भाजप आमदार गणपत गायकवाड कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल… तर आपण त्यांच्याबाबत जाणून घेऊयात सविस्तरपणे. गणपत गायकवाड हे सुरुवातीला केबल चालक म्हणून कल्याण आणि नजीकच्या परिसरात सर्वांना परिचित होते. आपल्या याच उद्योगाचा राजकीय दृष्ट्या फायदा कसा होईल हे त्यांना व्यवस्थित माहीत होतं. त्यामुळे 2009 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

कल्याण पूर्व मतदारसंघातून 2009 साली अपक्ष निवडून आल्यानंतर गणपण गायकवाड यांनी या मतदारसंघात आपला चांगलाच जम बसवला. त्यानंतर गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेतून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी गणपत गायकवाड कल्याण शहरात रिक्षा चालवायचे. नंतर त्यांनी केबलचा व्यवसाय केला. पण राजकीय क्षेत्रात येताच त्यांची बरीच आर्थिक प्रगती झाली.

हे ही वाचा>> Ganpat Gaikwad: BJP आमदाराचा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, ‘तो’ वाद काय? Inside Story

पहिल्यांदा आमदारकीसाठी उमेदवारी लढवली तेव्हा गणपत गायकवाड अपक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र, 2009 साली काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, 2014 साली राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते भाजपमध्येच आहेत.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते मानले जातात. गणपत गायकवाड यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांचं कल्याणमध्ये विविध समाजाचे नागरीक, सामाजिक संघटना यांच्यासोबत खूप चांगलं नातं आहे. ते आपल्याकडे मदतीसाठी येणाऱ्या नागरिकांना मदत करत असतात. याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. अशी त्यांची ओळख आहे.

तीन टर्म आमदार असलेले गणपत गायकवाड यांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. गायकवाड मोठे उद्योजक आहेत. त्यांचा मुलगा वैभव गायकवाड हा भाजपमध्ये कल्याण जिल्हा युवक अध्यक्ष पदावर आहे. पण जेव्हापासून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच गणपत गायकवाड यांनी त्यांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

भाजपनं कल्याण लोकसभेची जागा लढवावी. भाजपचा उमेदवार इथून सहज निवडून येईल, अशी भूमिका ते सातत्याने घेताना दिसले. एवढंच नव्हे तर ‘खोके घेऊन गद्दारी केली..’ अशी थेट टीका देखील त्यांनी केली होती. अशाप्रकारच्या टीका गायकवाडांकडून होत असताना दुसरीकडे त्यांना शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील तणाव दिवसेंदिवस हा वाढत होता. ज्याचं प्रत्यंतर हे कालच्या गोळीबारात झालं. ज्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT