WTC Final 2023, Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! रोहित शर्मा जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

India vs Australia WTC Final 2023: The Indian cricket team has to play an important match from Wednesday (June 7). team india skeeper rohit sharma injured.
India vs Australia WTC Final 2023: The Indian cricket team has to play an important match from Wednesday (June 7). team india skeeper rohit sharma injured.
social share
google news

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघाला बुधवारपासून (7 जून) महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 चा अंतिम सामना आहे. मात्र याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

WTC फायनलसाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. वृत्तानुसार, नेट प्रॅक्टिस दरम्यान एक वेगवान चेंडू रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला.

रोहितच्या अंगठ्याला झालेली दुखापत गंभीर नाही

रोहित लगेच बॅट सोडून आत गेला. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रोहितने पुढील नेट सराव केला नाही. मात्र, काही वेळाने भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमीही समोर आली. रोहित शर्माची दुखापत फारशी गंभीर नसल्याची माहिती समोर आली. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळू शकतो. WTC फायनल बुधवारपासून (7 जून) लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> WTC Final 2023, Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रणनीती काय? रोहित शर्मा म्हणाला…

आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांतीच नाही

खरंतर, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम खेळल्यानंतर भारतीय खेळाडू नुकतेच थेट लंडनला आले आहेत. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे रोजी (रिझर्व्ह-डे) खेळला गेला. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने २६ मे रोजी रोहितच्या नेतृत्वाखाली एलिमिनेटर सामना खेळला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळालेली नाही.

रोहित शर्मा खराब फॉर्मात

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. आयपीएलमध्येही त्याने दमदार कामगिरी केलेली नाही. मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. रोहितच्या नेतृत्वाखाली त्यांना एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आयपीएलमध्ये, रोहितने 16 सामने खेळले आणि 20.75 च्या माफक सरासरीने 332 धावा केल्या. यादरम्यान त्याला केवळ 2 अर्धशतकच करता आली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Ajinkya Rahane WTC Final : ‘अजिंक्य’साठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती!

मात्र, रोहितने यंदा कसोटीत काहीसा चांगला फॉर्म दाखवला आहे. या वर्षी त्याने 4 कसोटी सामने खेळले आणि 40.33 च्या सरासरीने 242 धावा केल्या. यादरम्यान त्याने शतकही ठोकले आहे. रोहितने हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय भूमीवरच खेळले. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT