Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली, पण कपिल देव म्हणाले..
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमातल्या विनोद कांबळी आणि सचिनच्या भेटीचा क्षण जगाने पाहिला. या दृश्यांमध्ये विनोद कांबळीची प्रकृती कमालीची ढासळल्याचं दिसत होतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विनोद कांबळीबद्दल काय म्हणाले कपिल देव?
कपिल देव विनोद कांबळीला मदत करणार?
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी अलीकडेच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिसला. मुंबईमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमातल्या विनोद कांबळी आणि सचिनच्या भेटीचा क्षण जगाने पाहिला. या दृश्यांमध्ये विनोद कांबळीची प्रकृती कमालीची ढासळल्याचं दिसत होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कपिल देव त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळालं आहे.
ADVERTISEMENT
विनोद कांबळीच्या जवळचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेट पंच मार्कस कौटो यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं होतं की, "कांबळीला आता अनेक गंभीर आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलं आहे. त्यामुळे आता पुनर्वसन केंद्रात (रिहॅब सेंटर) जाण्यातही काही अर्थ नाही. 14 वेळा आम्ही त्याला वसईतील पुनर्वसन केंद्रात नेलं आहे. ऑगस्टमध्येच विनोद कांबळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, कौटो आणि त्याचा भाऊ रिकी यांनी कांबळीची त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्याबद्दल बोलताना त्यांनी विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली.
हे ही वाचा >>Aaditya Thackeray meets Devendra Fadnavis : आदित्य ठाकरेंनी फडणवीसांशी हात मिळवला, पण गुलाबरावांना इग्नोर केलं?
त्यानंतर विनोद कांबळीच्या मदतीसाठी आता माजी भारतीय कर्णधार कपिल देवही धावून आल्याचं दिसतंय. विनोद कांबळीला दारूचं व्यसन असल्याची माहिती आहे, तसंच या काळात त्यानं आपल्या अनेक क्रिकेटमधील सहकाऱ्यांनाही वर्षानुवर्षे दूर ठेवल्याचं दिसलं आहे. आता भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कपिल देव यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, कांबळीला पुन्हा आधीसारखं व्हायचं असेल तर त्याला स्वत:ला एक पाऊल उचलावं लागणार आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Ajit Pawar : अजितदादांना मोठा दिलासा, आयकर विभागानं मुक्त केली जप्त मालमत्ता
माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू म्हणाले, "कपिल देव यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय की, जर विनोद कांबळीला पुनर्वसन केंद्रात जायचं असेल, तर आम्ही त्याला आर्थिक मदत करण्यास तयार आहोत. मात्र, आधी त्याला स्वत: तिथे जावं लागेल. उपचार करायचे असतील तर ते कितीही काळ चालले तरी आम्ही खर्च करण्यास तयार आहोत." कपिल देव यांनी याआधीही आपल्या संघातील सदस्यांना तसंच माजी क्रिकेटपटूंना मदत केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT