VIDEO: कोहली-स्टॉयनिस भिडले, मैदानातच धक्काबुक्की.. नंतर घडलं असं काही…

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

कोहली-स्टॉयनिसमध्ये मैदानातच राडा
कोहली-स्टॉयनिसमध्ये मैदानातच राडा
social share
google news

Marcus Stoinis Clashed with Virat Kohli : टीम इंडिया (India) विरूद्धचा तिसरा वनडे सामना ऑस्ट्रेलियाने (Austtalia) 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार अॅडम झंपा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) आणि मार्कस स्टॉइनिसमध्ये (Marcus Stoinis) मैदानातच धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. या धक्काबुकीवर विराट चांगलाच भडकला होता. क्रिकेट फॅन्स देखील या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करतायत.(marcus stoinis clashed with virat kohli pushed them in ground video viral in social media)

ADVERTISEMENT

व्हिडिओत काय?

टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान 21 व्या ओव्हरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. यावेळी मैदानावर के एल राहूल आणि विराट कोहली (Virat Kohli) खेळत होता. तर ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis) गोलंदाजीसाठी आला होता. स्टॉइनिसने बॉल टाकल्यानंतर राहूलने तो डॉट केला होता. हा बॉल टाकून झाल्यानंतर तो पुन्हा रन अपच्या दिशेने येत होता. यावेळी विराट देखील क्रिसवर चालत होता. दोघेही एकमेकांसमोर आले आणि त्यांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीनंतर विराट खुपच रागवला होता. मात्र दोन्ही खेळाडूंनी यावर मौन बाळगत खेळ पुढे सुरु ठेवला होता.

Ind vs Aus :टीम इंडियाचा शेवट कडू; ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका घातली खिशात

दरम्यान या दोघांचा मैदानातील धक्काबुक्कीचा हा व्हिडिओ पाहून क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला. अनेकांना नेमकं प्रकरणच कळालं नाही. कारण दोघांनीही एकमेंकाना धडक दिली. या धडकेनंतर विराटने (Virat Kohli) रागाच्या नजरेने त्याच्याकडे पाहिले मात्र स्टॉइनिस त्याला काही उत्तर न देता हसत हसत पुढे गेला. या संपुर्ण मैदानावरील राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

हे वाचलं का?

असा रंगला सामना

ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामीवीर ट्रेविस हेड आणि मिचेश मार्शने चांगली सुरुवात केली होती. मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावा केल्या. ट्रेविस हेडने 33 तर अॅलेक्स कॅरीने 38 धावा केल्या आहेत. तर इतर खेळाडू 30 धावांच्या आत आऊट झाले होते. टीम इंडियाने 269 धावात ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केले आहेत.टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि हार्दीक पंड्याने प्रत्येकी 3 तर सिराज आणि पटेलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

 

Viral Video : कुलदीप यादवची कमाल!ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला चकवा देत क्लिन बोल्ड

ऑस्ट्रेलियाने (Australia) दिलेल्या 269 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाचा (Team India) रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आक्रमक सुरुवात केली होती.रोहित शर्मा 30 धावा करून बाद झाला.त्यापाठोपाठ शुबमन गिल 37 धावावर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र तो देखील 54 धावांची अर्धशतकीय खेळी करून बाद झाला.गिलनंतर एकामागून एक विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच होता. राहूल 32, अक्षर पटेल 2, हार्दीक पड्या 40, सुर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा 18, कुलदीप यादव 6, शमी 14 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडियाचा डाव 248 धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने सर्वाधिक 4, तर अॅश्टन अगरने 2 आणि स्टॉईनिश आणि अबॉटने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Shreyas Iyer : टीम इंडियाला झटका! IPL, WTC मधून श्रेयस राहणार बाहेर, कारण…

दरम्यान तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 मालिका जिंकली होती. टीम इंडियाने 2-1 बॉर्डर गावस्कर
ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर वनडे मालिका ऑस्ट्रेलियाने खिशात घातली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT