India Sri Lanka Tour 2024 : टीम इंडियामध्ये 'गंभीर' युग, नेमकं काय-काय बदलणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

श्रीलंकेविरूद्ध भारताचे 6 सामने

point

'या' दौऱ्याचे नेतृत्व कोण करणार?

India Tour Of Sri Lanka 2024 : T20 मालिकेतील पाच सामन्यांच्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. या विजयासह शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने T20 मालिकेत 4-1 अशी खेळी केली. आता झिम्बाब्वे T20 मालिका संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळणार नाहीये. भारतीय संघ या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे त्यांना तीन एकदिवसीय आणि तीन T20 सामने खेळायचे आहेत. (india tour of srilanka 6 matches in 12 days know the details gautam gambhir era will begin with this tour )

श्रीलंकेविरूद्ध भारताचे 6 सामने

टीम इंडियासाठी हा दौरा खूप खास असणार आहे. या दौऱ्यातून गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहे. गेल्या महिन्यात भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकला होता. त्या स्पर्धेबरोबरच राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माजी सलामीवीर गौतम गंभीरला टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषित केले आहे.

हेही वाचा : Vishalgad : "...ही घटना टळली असती"; शाहू महाराज संतापले, सरकारला सुनावले

भारतीय संघ 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्याला सुरुवात करणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ 12 दिवसांत एकूण 12 सामने खेळणार आहे. पहिला, भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची T20 मालिका खेळली जाईल. पहिला T20 27 रोजी, दुसरा T20 28 रोजी आणि शेवटचा T20 सामना 30 जुलै रोजी खेळला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून पल्लेकेले येथे खेळले जातील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामने 4 आणि 7 ऑगस्ट रोजी होतील. तिन्ही एकदिवसीय सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे खेळले जातील. प्रेमदासा स्टेडियमवर हे सामने खेळले जाणार आहेत. 50-50 षटकांचे हे एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होतील.

हेही वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले...,अंजनेरी गडावर भयंकर थरार

 

'या' दौऱ्याचे नेतृत्व कोण करणार?

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. माहितीनुसार या आठवड्यात टीमची घोषणा केली जाऊ शकते. या दौऱ्यासाठी भारतीय T20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले जाऊ शकते. तर वनडेची कमान केएल राहुलकडे दिली जाऊ शकते. रोहित शर्माने विश्वचषकानंतरच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर हार्दिक टी-20 आणि केएल राहुल वनडेमध्ये कर्णधार होऊ शकतात.

ADVERTISEMENT

हेही वाचा : 'जावेद जाफरीच्या लेकाला अंबानींकडून 30 कोटींचे अपार्टमेंट भेट'; KRK चा दावा, फेक की फॅक्ट?

 

भारत-श्रीलंका वेळापत्रक

  • 27 जुलै- पहिला T20 सामना, पल्लेकेले
  • 28 जुलै- दुसरा T20 सामना, पल्लेकेले
  • 30 जुलै- तिसरा T20 सामना, पल्लेकेले
  • 2 ऑगस्ट- पहिला वनडे सामना, कोलंबो
  • 4 ऑगस्ट- दुसरा वनडे सामना, कोलंबो
  • 7 ऑगस्ट- तिसरा वनडे सामना, कोलंबो

    follow whatsapp

    ADVERTISEMENT