Rohit Sharma : एम एस धोनी नव्हे, 'या' व्यक्तीनं रोहित शर्माला केलं ओपनर, Video आला समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rohit Sharma Opening Batting Facts
Rohit Sharma Opening Batting Facts
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रोहित शर्माच्या सलामीच्या फलंदाजीचं रहस्य उलगडलं

point

रोहित शर्माचे बालपणीचे कोच दिनेश लाड यांचा व्हिडीओ पाहिलात का?

point

दिनेश लाड यांनी रोहित शर्माबाबत दिली मोठी प्रतिक्रिया

Rohit Sharma Latest News : मैदानात चौकार षटकारांचा पाऊस पाडून भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबाबत मोठा खुलासा समोर आला आहे.रोहित शर्माला सलामीचा फलंदाज करण्याचं श्रेय एम एस धोनीला दिलं जातं. धोनीनेच रोहित शर्माला सलामीला फलंदाजी करण्याची पहिली संधी दिली, असं लोकांना वाटतं. परंतु, रोहितला ओपनर करण्यात धोनी नव्हे, तर रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचा (दिनेश लाड) मोलाचा वाटा आहे. दिनेश लाड यांनी रोहितमध्ये असलेला छुपा टॅलेंट बालपणीच ओळखला होता. त्यांचा एक व्हिीडओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते रोहित शर्माबद्दल खास चर्चा करताना दिसत आहेत. 

या व्हिडीओत रोहितचे प्रशिक्षक सांगतात की, बोरीवली स्पोर्ट्स असोसिएशनने एका टूर्नामेंटचं आयोजन केलं होतं. तिथे अंडर 10,12,14 आणि 16 चे खेळाडू सहभागी होऊ शकले असते. त्याचदरम्यान आमच्या शाळेची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. रोहित शर्मा समोरच्या (विरोधी टीम) मध्ये खेळत होता. त्यावेळी तो गोलंदाजी करत होता. त्याने गोलंदाजीला सुरुवात केल्यावर त्याच्या अॅक्शनला पाहून मी इम्प्रेस झालो.

हे ही वाचा >> Optical Illusion Image: गरुडासारखी नजर आहे? मग 11 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेले 9 चेहरे 

सामना संपल्यानंतर मी त्याला बोलावलं आणि त्याचं नाव विचारलं. त्याने सांगितलं रोहित शर्मा. मी म्हणालो, तुझे पालक असतील तर त्यांना बोलव. मी त्यांच्याशी बोलेल. मी रोहितला एक गोलंदाज म्हणून अंडर 14 व्यतिरिक्त अंडर 16 च्या टीममध्ये प्रमोट केलं. रोहित शर्माला सलामीचा फलंदाज बनवण्याबाबत बोलताना ते म्हणाले,  मी शाळेत जात होतो. त्याचदरम्यान मी पाहिलं की एक मुलगा नॉक (क्रिकेटचा सराव) करत होता. मी त्याच्या पाठिमागच्या बाजूला उभा होतो. त्यामुळे मी त्याचा चेहरा पाहू शकलो नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इथे पाहा रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचा व्हिडीओ

पण मी त्याची फलंदाजी करण्याची टेकनिक पाहिली, तो योग्य प्रकारे स्ट्रोक्स खेळत होता. हा मुलगा कोण आहे इतका चांगला, असा फलंदाज तर मी पाहिला नाही, असा विचार माझ्या मनात आला. शाळेत जाऊत पाहिलं तर, तो रोहित होता. तू फलंदाजीही करतो, असं मी त्याला विचारलं. मी त्याला सांगितलं की, नेटमध्ये जा आणि सलामीला फलंदाजी कर. मी त्याला पॅड अप करून नेटमध्ये फलंदाजी करायला सांगितलं. रोहितने ज्या प्रकारे फलंदाजी केली, ते पाहून मी इतका इम्प्रेस झालो की, मी त्याला गोलंदाजी ऐवजी फलंदाज म्हणून प्रमोट केलं.

हे ही वाचा >> Virat Kohli: सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये कोहलीची 'विराट' झेप! मैदानात पाडलाय पैशांचा पाऊस, नेटवर्थ पाहून थक्कच व्हाल


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT