IPL 2023 : ‘सिक्सर पंच’ने गुजरातचा धुव्वा; कोण आहे रिंकू सिंग?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rinku Singh hit 5 consecutive sixes in the last over. Who is Rinku Shingh?
Rinku Singh hit 5 consecutive sixes in the last over. Who is Rinku Shingh?
social share
google news

Indian Premier League 2023 :

अहमदाबद : कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फलंदाज रिंकू सिंगने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) असा पराक्रम केला आहे, ज्याचा कोणी स्वप्नातही विचारही केला नसेल. रविवारी (9 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सला गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujarat Titans) सामन्यात रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग 5 षटकार मारून 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी 29 धावांची गरज असताना रिंकूने यश दयालला खणखणीत 5 षटकार हाणले. (Rinku Singh hit 5 consecutive sixes in the last over to help Kolkata Knight Riders win by 3 wickets in the match against Gujarat Titans)

यश दयालच्या त्या षटकात पहिल्या चेंडूवर उमेश यादवने 1 धाव घेत रिंकू सिंगला स्ट्राइक दिला. यानंतर विजयासाठी 5 चेंडूत 28 धावा हव्या होत्या. त्यानंतर डावखुरा फलंदाज रिंकूने सामन्यात असे षटकार ठोकले की गुजरात संघ पाहतच राहिला. रिंकू सिंगने 21 चेंडूत 6 षटकार आणि एक चौकारासह 48 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच शेवटच्या षटकात इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

IPL 2023 : नवा रेकॉर्ड! आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

इम्पॅक्ट प्लेअर व्यंकटेश अय्यरने कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावली. व्यंकटेश अय्यरने 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. व्यंकटेशने 40 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र, व्यंकटेश बाद झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने हॅट्ट्रिक घेतल्याने खेळाला अचानक कलाटणी मिळाली. रशीदने आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांना लागोपाठच्या चेंडूंवर पॅव्हेलिअनमध्ये पाठवले. सात विकेट्स पडल्याने गुजरातचा विजय निश्चित वाटत होता, पण रिंकूने चमत्कार केला.

गुजरातने कोलकत्याला 205 धावांचे लक्ष्य दिले होते, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यापूर्वी गुजरात टायटन्सने 20 षटकात चार गडी गमावून 204 धावा केल्या. गुजरातकडून तुफानी फलंदाजी करताना विजय शंकरने 24 चेंडूत 63 धावांची खेळी केली, ज्यात चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. शंकरने शेवटच्या षटकात शार्दुलला सलग तीन षटकार ठोकले. साई सुदर्शननेही गुजरातकडून 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली. कोलकात्याकडून सुनील नरेनने तीन विकेट घेतल्या.

ADVERTISEMENT

टीम इंडियाचा ‘गब्बर’ फॉर्मात, वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार?

रिंकू सिंग कोण आहे?

रिंकू सिंग हा मुळचा उत्तर प्रदेशमधील अलिगढचा. 12 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेल्या रिंकूचा आजवरचा क्रिकेटचा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. रिंकू सिंग पाच भावंडांमध्ये तिसरा. त्याचे वडील गॅस सिलिंडर वितरणाचे काम करायचे. अशा परिस्थितीत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे रिंकूने क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला. रिंकूच्या मेहनतीला 2014 मध्ये फळ मिळाले. त्याला उत्तर प्रदेशकडून लिस्ट-ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2 वर्षांनी रिंकू सिंगने पंजाबविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रिंकू सिंगने आतापर्यंत 40 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7 शतके आणि 19 अर्धशतकांच्या मदतीने 2875 धावा केल्या आहेत.

ADVERTISEMENT

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 59.89 आहे आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 163 आहे. रिंकूने आतापर्यंत 50 लिस्ट-ए सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 53 च्या सरासरीने 1749 धावा केल्या आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये रिंकू सिंगच्या नावावर 1 शतक आणि 16 अर्धशतके आहेत. रिंकूने 78 T20 सामन्यांमध्ये 6 अर्धशतकांसह 1392 धावा केल्या. IPL 2017 लिलावापूर्वी, रिंकूला किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) ने 10 लाख रुपयांना विकत घेतले होते. त्या मोसमात त्याला एकच सामना खेळायला मिळाला. 2018 च्या हंगामात रिंकूला कोलकत्याने करारबद्ध केले. IPL 2022 च्या लिलावात रिकू सिंगला KKR ने 55 लाख रुपयांना विकत घेतले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT