Team India ला मिळाला दुसरा 'अश्विन', मुंबईचा 'या' पोराची तुफान चर्चा!
Himanshu Sing Bowling Video : बांगलादेश विरुद्ध सुरु होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 19 सप्टेंबरला सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी रविवारीच टीम इंडियाचा स्क्वॉड जाहीर करण्यात आला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना मिळाला अश्विनसारखा फिरकीपटू
टीम इंडियाचे मुुख्य निवडकर्त अजित अगरकरांनी का दिली संधी?
'त्या' सामन्यामुळं हिंमाशू सिंग चमकला
Himanshu Sing Bowling Video : बांगलादेश विरुद्ध सुरु होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 19 सप्टेंबरला सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी रविवारीच टीम इंडियाचा स्क्वॉड जाहीर करण्यात आला. दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या स्क्वॉडची घोषणा काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. परंतु, मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी टीम इंडियाच्या शिबिरात दोन नेट बॉलर्सला बोलावलं आहे. यामध्ये 6 फूट आणि 4 इंच उंच असलेल्या हिमांशु सिंगचा समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून युद्धवीर सिंग याला टीम इंडियाच्या नेटमध्ये संधी देण्यात आली आहे.हिमांशू सिंगची गो अगरकर यांनी या गोलंदाजाची निवड का केली? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. (16 member Indian squad has been announced for the two Test series against Bangladesh. Team India's squad was announced on Sunday for the test match starting on 19th September)
ADVERTISEMENT
मुंबईसाठी चमकदार कामगिरी
रिपोर्टनुसार, या फिरकीपटुनं घरच्या मैदानात अप्रतिम कामगिर केल्यामुळं अगरकर खूप प्रभावित झाले. विशेष म्हणजे हिंमाशू सिंगच्या फिरकी गोलंदाजीची अॅक्शन दिग्गज फिरकीपटू आर अश्विनच्या स्टाईलसोबत मिळती जुळती आहे. मुंबईतील 21 वर्षीय हिंमाशू सिंगने मुंबईसाठी वेगवेगळ्या वयोगटातील क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बांगलादेशसाठी नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या हिंमाशूला मुंबईच्या मोठ्या टूर्नामेंट खेळायच्या बाकी आहेत. हिमांशुने मुंबईसाठी अंडर-16 आमि अंडर-23 च्या फॉर्मेटचं क्रिकेट खेळलं आहे.
हे ही वाचा >> Lokpoll Survey : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठा सर्व्हे आला समोर! MVA उडवणार महायुती सरकारची झोप
त्या कामगिरीमुळं अगरकरांच्या नजरेत आला
यावर्षी हिंमाशूला सीके नायुडु ट्रॉफीसाठी मुंबईच्या अंडर-23 संघात निवडलं गेलं. त्यानंतर त्याने 18.92 च्या सरासरीनं 38 विकेट्स घेतल्या. या टूर्नामेंटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या टॉप-10 गोलंदाजांच्या लिस्टमध्ये त्याचा समावेश होता. उपांत्यपूर्व फेरीच्या दोन्ही इनिंगमध्ये हिंमांशूने 64 धावा देऊन 7 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 78 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर हिंमाशू प्रकाशझोतात आला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Today Horoscope: सूर्याचं होणार नक्षत्र परिवर्तन! सोन्यासारखं चमकेल 'या' 4 राशींच्या लोकांचं नशीब
आंध्रप्रदेश विरुद्ध अप्रतिम कामगिरी
या हंगामात हिंमांशू काही दिवसांपूर्वीच बुची बाबू टूर्नामेंटमध्ये मुंबईसाठी खेळला होता. म्हैसूरमध्ये नुकत्याच खेळवण्यात आलेल्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या टूर्नामेंटमध्येही तो सहभागी होता. थमम्मापीया मेमोरियल टूर्नामेंटमध्ये हिंमांशूने आंध प्रदेश विरुद्ध पहिल्या इनिंगमध्येच 7 विकेट्स घेतल्या होत्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT