पहलगाममध्ये 28 निष्पापांचा घेतला जीव, 'हा' नराधम आहे मास्टरमाईंड... त्याच्यावर पाक लष्कर उधळतं फुलं!

मुंबई तक

Mastermind Of Pahalgam Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. बैसरनच्या घाटीत झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Pahalgam Terrorist Attack Mastermind
Pahalgam Terrorist Attack Mastermind
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहे मास्टरमाईंड सैफुल्लाह ?

point

भारताविरोधात नेहमीच गरळ ओकतो

point

टीआरएफ द रेजिस्टेंस फ्रंटने या हल्ल्याची घेतली जबाबदारी

Mastermind Of Pahalgam Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. बैसरनच्या घाटीत झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 17 पर्यटक गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेच्याआधी पहलगाममध्ये हल्ला करून देशातील वातावरण भायवह केलं आहे.

या हल्ल्यात पर्यटकांना निशाणा बनवण्यात आला.  टीआरएफ द रेजिस्टेंस फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामागे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सैफुल्लाह खालिदचा हात असू शकतो. तोच या हल्ल्यांचा सूत्रधार आहे.

कोण आहे मास्टरमाईंड सैफुल्लाह ?

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सैफुल्लाह खालिद, लष्कर-ए-तयबाचा डेप्युटी चीफ आहे. ज्याला सैफुल्लाह कसूरी नावानेही ओळखलं जातं. सर्वात मोठी बाब म्हणजे भारताचा सर्वात मोठा दुश्मन हाफीज सईद त्याच्या खूप जवळचा आहे. भारतात जेव्हा मोठा दहशतवादी हल्ला होतो. तेव्हा या दहशतवाद्याचं नाव नेहमी समोर येतं. सैफुल्लाह नेमही लग्जरी कारमध्ये फिरतो. त्याच्या ताफ्यात इतर दहशतवादी सशस्त्रांसह फिरत असतात. तो पाकिस्तानी सेनेच्या जवानांना भडकवत असतो. पाकिस्तानी सेनेचे मोठे अधिकारी त्याचं फुलांनी स्वागत करतात, इतका मोठा दरारा या दहशतवाद्याचा आहे. 

हे ही वाचा >> Pahalgam Attack: 28 निष्पापांना ठार करणारे हेच ते नराधम... फोटो आणि स्केच आलं समोर

पहलगाम हल्ल्याच्या दोन महिने आधी सैफुल्लाह खालिद पाकिस्तानी पंजाबच्या कंगनपूरमध्ये पाकिस्तानी सेनेच्या एका मोठ्या बटालियनला भेटला होता. तिथे पोहोचल्यानंतर त्याने स्वत: पाक सेनेचा एक कर्नल जाहिद जरीन खटकने त्याचं जंगी स्वागत केलं होतं. त्यानंतर पाक सेनेला भडकवण्यासाठी भारता विरोधात भाषण दिलं होतं. 

भारताविरोधात नेहमीच गरळ ओकतो

खैबर पख्तूनख्वाने नुकत्याच एका आयोजित सभेत कट्टरपंथी आणि दहशतवादी नेटवर्कने जोडलेला चेहरा सैफुल्लाह कसूरीने भारता विरोधात भाषण करून जाहीर धमकी दिली होती. 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीरला स्वातंत्र्य करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, आमचे मुजाहिदीन मोठे हल्ले करतील, असं त्याने म्हटलं होतं. या सभेच आयोजन पाकिस्तानी एजन्सी ISI आणि पाकिस्तानी सेनेच्या मिलिभगतमुळे झाला होता. तिथे मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांनी सैफुल्लाहचा भाषण ऐकलं.

हे ही वाचा >> "जा..मोदीला जाऊन सांग...", दहशतवाद्यांनी पतीला मारलं ठार, पत्नीने सांगितला हल्ल्याचा A टू Z थरार!

हे वाचलं का?

    follow whatsapp