IND vs PAK: भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना कधी आणि कुठे पाहता येणार? 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

IND vs PAK T20 विश्वचषक सामना, विनामूल्य कुठे पाहता येणार?

point

'या' टीव्ही चॅनेलवर पाहता येणार लाइव्ह सामना...

point

2007 च्या T20 विश्वचषकात  भारताकडून पाकिस्तानचा दोनदा पराभव 

IND vs PAK T20 WC Live Streaming : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन संघात रविवारी (9 जून) हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या महासामन्याला आता फक्त अवघे तास उरले आहेत. दोन्ही संघांकडून सामन्याची जोरदार तयारी सुरू आहे. 9 जून रोजी हा सामना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात खेळला जाणार आहे. (T20 World Cup 2024 When and where to watch the high voltage India vs Pakistan match)

ADVERTISEMENT

टीम इंडियाने ICC टूर्नामेंटमध्ये आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजवले आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आगामी T20 विश्वचषक 2024 मध्ये भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता खेळला जाणार आहे. सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल तर बाबर आझम पाकिस्तान संघाचे नेतृत्व करेल.

हेही वाचा : विश्वचषकात नेमकं चाललंय तरी काय?, 'या' बलाढ्य टीमचा पराभव

 

IND vs PAK T20 विश्वचषक सामना, विनामूल्य कुठे पाहता येणार?

ओटीटी ॲप आणि टीव्ही चॅनलवरून हा सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकता. त्याचवेळी चाहते भारतीय चॅनल डीडीवर हा सामना विनामूल्य पाहू शकतात. याशिवाय, वेबसाइटवर पाहण्यासाठी, तुम्हाला Hotstar.com वर जावे लागेल, परंतु येथे विनामूल्य सामन्याचा आनंद घेता येणार नाही. मोबाईल आणि टॅबलेट यूजर्संना विनामूल्य सामना पाहण्यासाठी Disney Plus Hotstar अॅप डाउनलोड करावा लागेल. या अॅपवरून तुम्ही घरबसल्या एकही पैसा न खर्च करता सामना पाहू शकता.

हे वाचलं का?

'या' टीव्ही चॅनेलवर पाहता येणार लाइव्ह सामना...

भारत-पाकिस्तान सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाइव्ह पाहता येईल. यामध्ये चाहत्यांना विविध भाषांमधील चॅनल ऑप्शन मिळतील. स्टार स्पोर्ट्स 1 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 2 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ (HD+SD), स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु (HD+SD), मा गोल्ड, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड, सुवर्णा प्लस SD, DD स्पोर्ट्स चॅनेल अशा चॅनेल्सचा यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा : कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर मोठी कारवाई

 

2007 च्या T20 विश्वचषकात  भारताकडून पाकिस्तानचा दोनदा पराभव 

2007 च्या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान दोनदा भिडले होते. पहिल्यांदा 14 सप्टेंबर 2007 रोजी T20 विश्वचषकाच्या स्पर्धेत, भारताने हा सामना बॉल आऊटने जिंकला. 24 सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले. या सामन्यातही भारत पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव करत चॅम्पियन बनला होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Narendra Modi: शपथविधीची तारीख-वेळ ठरली, 'इथे' होणार सोहळा!

 

IND vs PAK 2012 T20 विश्वचषक

2012 मध्ये श्रीलंकेत झालेल्या स्पर्धेत सुपर-8 सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तान संघाने 128 धावा केल्या, ज्या भारताने दोन विकेट गमावून पूर्ण केल्या. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने 78 धावांची खेळी केली तर लक्ष्मीपती बालाजीने तीन विकेट घेतल्या.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT