Ind vs Eng semi final : पावसामुळे सामना रद्द झाला, तर भारतीय संघ बाहेर पडेल? नियम काय, जाणून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

T20 World cup : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात पहिला उपांत्य सामना.
टी20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे सावट.
social share
google news

T20 World Cup 2024 Semi Final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने ग्रुप स्टेज आणि नंतर सुपर-8 मध्ये आपले सर्व सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पण, आता उपांत्य फेरीत टीम इंडियाला हवामान साथ देईल का आणि पाऊस पडल्यास काय होईल? (ind vs eng semi final weather report News)

भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील सामना 27 जून रोजी इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

उपांत्य फेरीतील सामन्यासाठी राखीव दिवस आहे का?

उपांत्य सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडला आणि उपांत्य फेरीतील सामना झाला नाही तर? त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे का? असाही प्रश्नही विचारला जातोय. त्याचबरोबर सामना रद्द झाल्यास भारतीय संघ बाहेर पडेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> लोकसभेला पडले, चिखलीकरांसाठी विधानसभेची लढाईही कठीण?

दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीने कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. पण पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाऊस पडल्यास राखीव दिवसाऐवजी त्या सामन्यासाठी 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सामना त्याच दिवशी खेळवता येईल.

सामना रद्द करावा लागला तर काय?

27 जून रोजी सामन्याच्या दिवशी गयानामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो. 

ADVERTISEMENT

त्यामुळे प्रथम 4 तास 10 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. असे न झाल्यास गट टप्प्यात अव्वल स्थानी असलेल्या संघाला फायदा होईल आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मविआला रोखण्यासाठी महायुतीची स्ट्रॅटजी! विधानसभेसाठी अशी मत'पेरणी'?

म्हणजे फक्त भारतालाच फायदा होईल. भारतीय संघाने सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. तर ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ बाहेर पडेल.

T20 विश्वचषकात भारत-इंग्लंड संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हरितालिका आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली आणि मार्क वूड .

    follow whatsapp

    ADVERTISEMENT