AFG vs BAN T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने रचला इतिहास, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

टी20 विश्वचषक स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा संघ बाद झाला आहे.
अफगाणिस्तानने टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे, तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
social share
google news

AFG vs BAN T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होत अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला. अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारल्याने ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगले आहे. (Afghanistan entered in Semi final, Australia out from T20 world cup 2024)

ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 मध्ये बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला. किंग्सटाउन येथील अर्नोस वेल मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने आले. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला विजयासाठी 114 (DLS) चे लक्ष्य दिले होते. 

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. फजलहक फारुकीच्या चेंडूवर बांगलादेशने दुसऱ्याच षटकात तनजीद हसनची विकेट गमावली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर नवीन उल हकने नझमुल हुसेन शांतो (5) आणि अनुभवी खेळाडू शकीब अल हसन (0) यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले.

यानंतर राशिद खानने बांगलादेशलाा चौथा झटका दिला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात सौम्या सरकारला (10) बाद केले. यानंतर रशीद खानने त्याच्या पुढच्याच षटकात तौहीद ह्रदोयला (14) इब्राहिम जादरान करवी झेलबाद केले.

ADVERTISEMENT

यानंतर, राशिद खानच्या फिरकीची जादू पुन्हा एकदा बघायला मिळाली. त्याने बांगलादेशच्या 80 धावा झालेल्या असताना महमुदुल्ला (6) आणि रशीद खान (0) यांना एकापाठोपाठ एक बाद केले.

ADVERTISEMENT

यानंतर गुलबदिन नायब आला, त्याने तनझिम हसनला (३) मोहम्मद नबीकडे झेलबाद करून बांगलादेशी संघाला आठवा धक्का दिला.

शेवटच्या 2 षटकांचा थरार

शेवटच्या 2 षटकात बांगलादेशला विजयासाठी 12 धावांची गरज होती आणि 8 गडी बाद झाले होते. बांगलादेशची धावसंख्या 102/8 होती. नवीन उल हक 18 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात तस्किन अहमदला नवीनने क्लीन बोल्ड केले.

अफगाणिस्तानने केल्या 115 धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने पाच गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा केल्या. अफगाण संघाची सुरुवात अतिशय संथ झाली. 

इब्राहिम जादरान आणि रहमानुउल्लाह गुरबाजने 10.4 षटकात 54 धावांची भागीदारी केली. दरम्यान गुरबाज आणि जादरानला पॉवरप्लेचा फायदा घेता आला नाही. लेगस्पिनर रिशाद हुसेनने जादरानला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. 

सलामीची भागीदारी तुटल्यानंतर अफगाणिस्तानने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. अजमतुल्ला उमरझाई (10), गुलबदिन नायब (4) आणि मोहम्मद नबी (1) यांनी निराशाजनक कामगिरी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT