Ind vs Aus T20 : ‘नो बॉल’वर खेचून आणला विजय; 5 दिवसांत घेतला वर्ल्ड कपचा बदला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनची तुफानी खेळी. रिंकू सिंहने कांगारूंच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास…
ADVERTISEMENT
Suryakumar Yadav, India vs Australia 1st T20 : क्रिकेटप्रेमींना टी20 चा थरार अनुभवायला मिळाला. आस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव हवी असताना रिंकूने षटकार खेचत ऑस्ट्रेलियाच्या तोंडून विजयाचा खास हिसकावून घेतला. वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा भारताने अवघ्या 5 दिवसांत बदला घेतला. (India beat Australia by two wickets in first t20 match)
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. सूर्या सध्या ICC T20 फलंदाजी क्रमवारीत नंबर 1 खेळाडू आहे. चाहत्यांना त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. या T20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (23 नोव्हेंबर) विशाखापट्टणम येथे खेळला गेला.
जोश इंग्लिशचा तुफानी खेळ
या सामन्यात सूर्याने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाने स्फोटक खेळी केली. जोश इंग्लिसने तुफानी फलंदाजी करत 47 चेंडूत शतक झळकावले. या सामन्यात त्याने 50 चेंडूत 110 धावा केल्या. इंग्लिशने आपल्या खेळीत 8 षटकार आणि 11 चौकार लगावले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा 2 भारतीय क्रिकेटपटूंना झटका! दाखवला बाहेरचा रस्ता
इंग्लिश व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथनेही भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ ठरवत 41 चेंडूत 52 धावांची खेळी केली. इंग्लिश आणि स्मिथ यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 67 चेंडूत 130 धावांची भागीदारी झाली. या दोघांच्या झटपट खेळीच्या बळावर कांगारू संघाने 3 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
भारताने 22 धावांवरच गमावल्या 2 विकेट
209 धावांचे भले मोठे आव्हान बघून भारतीयांना विजयाच्या मावळल्या होत्या. ते सुरुवातीला खरं ठरताना दिसलं. भारतीय संघाने अवघ्या 22 धावांत ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन मैदानावर असल्याने चाहत्यांच्या कायम राहिल्या.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> IPL Transfer Window 2024 : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार? रोहित शर्मा बदलणार टीम!
सूर्यकुमार आणि ईशानने सुरुवातीला डाव सावरला आणि नंतर दोघेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजावर तुटून पडले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 चेंडूत 112 धावांची भागीदारी केली. ईशानने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले. पण, 39 चेंडूत 58 धावा करून तो बाद झाला.
ADVERTISEMENT
सूर्याची जबाबदार खेळी
सूर्यकुमार यादव जबाबदार खेळी करताना दिसला. त्याने 29 चेंडूत टी-20 मधील 16 वे अर्धशतक झळकावले. 42 चेंडूत 80 धावा करत सूर्या टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन गेला. काही दिवसांपूर्वी वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या तोंडून सूर्यकुमार विजयाचा घास हिसकावून घेतला.
What A Game!
What A Finish!
What Drama!
1 run to win on the last ball and it’s a NO BALL that seals #TeamIndia‘s win in the first #INDvAUS T20I! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/T64UnGxiJU @IDFCFIRSTBank pic.twitter.com/J4hvk0bWGN
— BCCI (@BCCI) November 23, 2023
श्वास थांबले… शेवटच्या षटकात रंगला थरार
194 धावांवर भारतीय संघाने सूर्याची विकेट गमावली. यानंतर रिंकू सिंहने सामन्याची सूत्रं हाती घेतली. मात्र, तोपर्यंत भारताने 8 विकेट गमावल्या होत्या. शेवटच्या षटकात थरार बघायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी एक धाव हवी होती. रिंकू सिंह फलंदाजी करत होता, तर गोलंदाज होता शॉन अॅबॉट. शेवटच्या चेंडूवर रिंकूने षटकार खेचत दिमाखदार विजय मिळवून दिला. ज्या बॉलवर रिंकूने षटकार खेचला, तो नो बॉल दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT