WTC Most Runs : नाव मोठं लक्षण खोटं! भारतीय फलंदाजांनी लाज घालवली
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वांधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमने (Babar Azam) मोठी झेप घेऊन विराट कोहलीला मागे टाकले आहे.
ADVERTISEMENT
WTC Most Runs : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC)फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. या पराभवानंतर (Team India) टीम इंडियाचे 10 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरण्याचे स्वप्न भंगले. आता या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वांधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमने (Babar Azam) मोठी झेप घेऊन विराट कोहलीला मागे टाकले आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) टॉ़प टेनमध्ये देखील स्थान पटकावू शकला नाही आहे.त्यामुळे विराटच्य़ा कामगिरीवर आता टीका होतेय. (virat kohli was behind babar azam most runs in wtc 2021-23 team india)
ADVERTISEMENT
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 मध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. कोहलीने 17 सामन्यात 1 शतक आणि तीन अर्धशतकाच्या मदतीने 932 धावा केल्या आहे. कोहली व्यतिरीक्त चेतेश्वर पुजाराने देखील WTCमध्ये गेल्या सीझनमध्ये 17 सामन्यात 928 धावा केल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ ऋषभ पंतचा नंबर लागतो. ऋषभ पंतने 12 सामन्यात 868 धावा केल्या आहेत. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने 11 सामन्यात 758 धावा केल्या आहेत. आणि रविंद्र जडेजाने 13 सामन्यात 721 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा : 6,6,6,6,6,6… पंजाब किंग्जच्या खेळाडूंचं मैदानावर ‘वादळ’, ठोकलं तुफानी शतक
इंग्लंडचा जो रूट एक नंबर
दरम्यान WTCच्या दुसऱ्या सीझनमध्ये विराट कोहली टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला असला तरी ओवरऑल खेळाडूंच्या क्रमवारीत तो टॉ़प 10मध्येही येत नाही. कोहलीने या क्रमवारीत 17वा नंबर पटकावला आहे. तर या क्रमवारीत पहिल्या स्थानी इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट आहे. रूटने 22 सामन्य़ात 1915 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 8 शतक आणि 6 अर्धशतकाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा 1621 धावा करून दुसऱ्या स्थानी आहे. तर मार्नस लाबुशेन 1576 धावा करून तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 1527 धावा करून चौथे स्थान पटकावले आहे. लिंटन दास 1024 धावा, दिनेश चांदिमल 958 धावा केल्या आहे. हे सर्व खेळाडू कोहलीहून सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर आहेत.
हे वाचलं का?
भारतीय खेळाडूंच्या धावा
विराट कोहली : 17 सामने, 932 धावा, 32.13 स्ट्राईक रेट, एक शतक आणि तीन अर्धशतक
चेतेश्वर पुजारा : 17 सामने, 928 धावा, 32 स्ट्राईक रेट,एक शतक आणि सहा अर्धशतक
ऋषभ पंत : 12 सामने, 868 धावा, 43.40 स्ट्राईक रेट,दोन शतक आणि पाच अर्धशतक
रोहित शर्मा : 11 सामने, 758 धावा, 42.11 स्ट्राईक रेट,दोन शतक आणि दोन अर्धशतक
रविंद्र जडेजा : 13 सामने 721 धावा, 36.04 स्ट्राईक रेट,दोन शतक आणि तीन अर्धशतक
हे ही वाचा : Ind vs Wi : सीनियर खेळाडूंचा पत्ता कट! वेस्ट इंडिज दौऱ्यात युवांना मिळणार संधी
WTC 2021-23 मध्ये स्टार परफॉर्मन्स
सर्वाधिक धावा : जो रूट 1915 धावा
सर्वाधिक विकेट : नाथन लयान 88 विकेट
सर्वाधिक स्कोर :टॉम लॅथम 252 रन्स
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी : एजाज पटेल विरूद्ध भारत (10/119)
सर्वाधिक सिक्स : बेन स्टोक्स 28 सिक्स
एका सामन्यात सर्वाधिक 5 विकेट : नाथन लायन (5 वेळा)
सर्वाधिक कॅच : स्टीव्ह स्मिथ 34
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT