Ajinkya Rahane WTC Final : ‘अजिंक्य’साठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती!

मुंबई तक

ADVERTISEMENT

WTC Final : Ajinkya Rahane will have to show his strength, if he flops, he will be cut again!
WTC Final : Ajinkya Rahane will have to show his strength, if he flops, he will be cut again!
social share
google news

Ajinkya Rahane News : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. जागतिक क्रमवारीत नंबर वन टीम इंडिया आणि नंबर दोन ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या या अंतिम सामन्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. अंतिम सामन्यातही सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणेवर असणार आहेत.

ADVERTISEMENT

अजिंक्य रहाणे 18 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. प्लेइंग-11 मध्ये रहाणेचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर वगळण्यात आले होते.

काऊंटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पुजाराने राष्ट्रीय संघात आरामात पुनरागमन केले, परंतु राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी रहाणेला बराच काळ प्रतीक्षा करावी लागली.

हे वाचलं का?

अजिंक्य रहाणेवर असणार खूप दडपण

अखेरीस अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी आणि नुकत्याच खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 16व्या हंगामात चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. तसं पाहिलं तर रहाणेला श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळेच पुनरागमन करता आलं.

अय्यरने मधल्या फळीत स्वत:ला सिद्ध केले आहे, अशा स्थितीत रहाणे ओव्हलच्या मैदानावर उतरेल तेव्हा त्याच्यासाठी ‘करा किंवा मरा’ची परिस्थिती असेल. रहाणेला पुढील मालिकेसाठी संघातील स्थान निश्चित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Wrestlers Protest : 7 तक्रारी… WFI ब्रिजभूषण सिंह यांच्यावर नेमके आरोप काय?

रहाणे या संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला, तर पुढच्या काळात त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार नाही. टी-20 मधून कसोटी क्रिकेटमध्ये बदल करत असलेल्या रहाणेला गोष्टी सोप्या ठेवायच्या आहेत आणि त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये ज्या उत्कृष्ट टाइमिंगसह धावा केल्या आहेत ते कसोटीतही बघायला मिळेल.

ADVERTISEMENT

82 कसोटी सामने खेळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले होते. त्यानंतर त्याने आपल्या खेळाने आणि कर्णधारपदाने खूप प्रभावित केले.

अजिंक्य रहाणेची सरासरी 40 पेक्षा कमी

ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 34 वर्षीय अजिंक्य रहाणे चांगली कामगिरी करत आला आहे. ही वेगळी बाब आहे की, त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे त्याची कसोटी सरासरी 38.52 टक्के आहे. WTC फायनलमध्ये रहाणेवर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नसेल, त्यामुळे त्याचे लक्ष फलंदाजीवर असेल. त्याला त्याच्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर द्यायची संधी यानिमित्ताने असणार आहे.

अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय विक्रम

– 82 कसोटी, 4931 धावा, 38.52 सरासरी
– 90 वनडे, 2962 धावा, 35.26 सरासरी
– 20 T20, 375 धावा, 20.83 सरासरी

हेही वाचा >> WTC Final ड्यूक बॉलने खेळवणार, पण टीम इंडियाला SG बॉलची सवय

WTC फायनलसाठी टीम इंडियाचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाक, अक्षर पटेल, मोहम्मद ठाक शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT