Profile

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात झाला होता. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे) हे एक समाजसुधारक होते. बाळासाहेबांनी लहानपणापासूनच व्यंगचित्र काढायला सुरुवात केली. १९६० मध्ये त्यांनी "मार्मिक" हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकातून त्यांनी मराठी माणसाच्या समस्यांवर भाष्य केले.

१९६६ मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.1995 साली त्यांनी भाजपसोबत महाराष्ट्रात त्यांनी सत्ता मिळवली होती.

बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व सांभाळले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT