Astro: फक्त एक जायफळ अन् बदलेल तुमचं नशीबच! काय आहे रहस्य?

Astro Tips: आयुष्यात बऱ्याच अडचणी येत असल्यास लोक ज्योतिषांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार, आरोग्याशी संबंधित अडचणींसाठी जायफळचा वापर त्यावर रामबाण उपाय ठरु शकतो. यावर, प्रसिद्ध ज्योतिषी कमल नंदलाल यांनी काय म्हटलंय?

Astro tips

Astro tips

मुंबई तक

18 Apr 2025 (अपडेटेड: 18 Apr 2025, 01:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ज्योतिषशास्त्रानुसार, जायफळचे महत्त्व

point

आरोग्याच्या समस्यांवर जायफळचा उपाय

point

ज्योतिषांच्या मते, जायफळचा उपाय करण्याची योग्य पद्धत

Astro Tips: दर रविवारी, गावातील सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक वृद्ध साधु गंगा घाटावर येत असायचा. त्यावेळी त्याच्या हातात नेहमी एक छोटीशी गोष्ट असायची, ती म्हणजे एक जायफळ! गावातील लोकांच्या मते, तो कोणी साधारण माणूस नव्हता, बरं का! तर, तो पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेल्या ज्ञानाचा रक्षक होता. 

हे वाचलं का?

एके दिवशी, बऱ्याच काळापासून अस्वस्थ असलेली रेखा त्या साधुजवळ गेली. त्यावेळी रेखाला शेवटचा आशेचा किरण दिसत होता.  त्यावेळी साधु तिच्याकडे पाहत स्मित हास्य करत म्हणाले, "मुली जायफळमध्ये सूर्याचं तेज लपलेलं आहे. जर जायफळाचा योग्यरितीने वापर केलास तर तुझ्या आयुष्यातील वाईट गोष्ट आपोआप निघून जाईल." रेखाने साधुंची गोष्ट ऐकली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिने सर्व काही केलं. 

काही काळानंतर, रेखाला तिच्या आयुष्यात चांगला आणि सकारात्मक बदल जाणवू लागला. जायफळाचा उपयोग कसा करावा? याविषयी ज्योतिषी कमल नंदलाल यांनीसद्धा सांगितलं आहे.  त्यांच्या मते, जायफळाच्या साहाय्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळवता येते आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. हा उपाय करण्याची पद्धत आणि त्याची विशेषता जाणून घ्या.

हे ही वाचा: Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी लावा घड्याळ, तुम्हाला मिळेल यश आणि प्रचंड सुख!

ज्यातिषशास्त्रानुसार, जायफळ आणि सूर्याचं महत्त्व

कमल नंदलाल म्हणतात की जायफळ हे सहसा वेलची, दालचिनी आणि लवंग यांसारख्या मसाल्यांप्रमाणे वापरले जाणारे एक खास फळ आहे. ज्योतिषशास्त्रात, याचा संबंध सूर्य म्हणजेच आपल्या आरोग्याच्या प्रमुख कारकाशी असल्याचं सांगितलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्य कमजोर असतो किंवा सहाव्या, आठव्या, बाराव्या आणि सातव्या भावात म्हणजेच विशेषत: त्रिकेश (6, 8, 12 भावांचा स्वामी) असल्यामुळे ते वारंवार सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजाराने ग्रासलेले असतात. अशा परिस्थितीत, जायफळचा हा उपाय रामबाण ठरु शकतो. 

उपाय करण्याची योग्य पद्धत

योग्य दिवसाची निवड: रविवार, मंगळवार, गुरुवार किंवा सप्तमी, द्वादशी, पंचमी, प्रतिपदा या तिथीला हा उपाय करा. जर तो शिवयोगाचा दिवस असेल तर तो आणखी उत्तम.

जायफळ ठेवण्याची पद्धत: एक जायफळ घ्या आणि ते तुमच्या मुठीत बंद करा.

मंत्राचा जप करा: मनात 'आदित्याय नमः' किंवा 'सूर्यय नमः' या मंत्राचा 12 वेळा जप करताना डोक्यावरून जायफळ फिरवा. मंत्र मोठ्याने म्हणू नका, फक्त तो तुमच्या मनात वारंवार म्हणा.

कापूर वापरून प्रक्रिया: सकाळी (आंघोळ न करताही हे करू शकता) मातीच्या दिव्यात भरपूर कापूर जाळा. जळत्या कापूरवर जायफळ टाका.

ध्यान आणि जप: डोळे बंद करा, सूर्याकडे तोंड करा आणि मनात 'सूर्याय नमः' मंत्राचा जप करत रहा.

हे ही वाचा: पालघर, ठाणे, मुंबईत कोरडं हवामान! 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह धो धो पाऊस बरसणार

या उपायाचं महत्त्व

कमल नंदलाल यांच्या मते, या उपायात आंघोळ करणे अनिवार्य नाही कारण याचा आरोग्य आणि नकारात्मकतेशी थेट संबंध आहे. आजारी व्यक्तीसाठी हे सहज आणि सोप्या पद्धतीने करता येते. हा उपाय केल्याने तुमच्या आरोग्यात चांगला आणि लक्षणीय बदल होईल, असे ज्योतिषांचं म्हणणं आहे. 

टीप: ही माहिती ज्योतिषशास्त्र, वास्तू शास्त्र आणि त्याभोवती असलेल्या श्रद्धा आणि युक्तिवादांवर आधारित आहे. एका ज्योतिषाच्या हवाल्याने आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत. मुंबई Tak अशा समजुती आणि युक्त्यांना समर्थन देत नाही.


 

    follow whatsapp