Vastu tips Wall Clock: मुंबईच्या दादरमध्ये राहणाऱ्या गौरव आणि नेहाने (काल्पनिक नाव) नुकताच त्यांच्या नवीन घरात प्रवेश केला होता. चांगली नोकरी, उत्तम व्यवसाय आणि आनंदी जीवन, असं सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांना हळूहळू वाईट अनुभव दिसायला लागले. गौरवची व्हावी तशी प्रगती होत नव्हती. तसेच, नेहाची तब्येत बिघडत चालली होती. या सगळ्याचा परिणाम त्या दोघांच्या नात्यावर होत होता. मात्र, या अडचणी का येत आहेत? याबद्दल त्यांना काहीच कgळत नव्हतं.
ADVERTISEMENT
या सगळ्या सुरू असतानाच त्यांच्या घराच्या शेजारील ताई काही कामानिमित्त नेहाकडे आली. नेहा अस्वस्थ असल्याचं ताईने पाहिलं. त्या ताईने नेहाला याचं कारण विचारल्यानंतर सुरुवातीला नेहाने याबद्दल सांगण्यास टाळलं. नंतर काही वेळात मात्र नेहाने तिच्या आयुष्यात येत असलेल्या सगळ्या अडचणींविषयी सांगितलं. त्यावेळी, नेहाच्या घरातील भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे ताईचं लक्ष गेलं. ते पाहिल्यानंतर, ताईने नेहाला ते घड्याळ भिंतीवरील त्या जागेवरुन काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा सल्ला दिला.
ज्योतिषशास्त्रात, घरातील भिंतीवरील घड्याळाची दिशासुद्धा महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. याविषयी सुप्रसिद्ध वास्तुविशारद कमल नंदलाल म्हणतात, "घरातील घड्याळाची दिशा व्यक्तीच्या नशिबावर परिणाम करु शकते. त्यांच्या मते, घरातील दक्षिण आणि पश्चिम दिशेत लावलेली घड्याळे काळात सुरळीत चालण्यात व्यत्यय आणू शकतात. तसेच, घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेत लावलेली घड्याळे वेळेला गती देऊ शकतात. भिंतीवर लावलेल्या घड्याळाचा आयुष्यावर कसा परिणाम होतो? सविस्तर जाणून घ्या.
हे ही वाचा: Astro: कपाळावर टिळा लावल्याने बदलतं नशीब! तुम्हालाही होईल प्रचंड फायदा
घरातील दिशेत घड्याळ लावण्याची चुक करु नका
दक्षिण दिशा (South Wall) : वास्तुनुसार, दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्याचे मानले जाते. या दिशेत घड्याळ लावल्याने जीवनात प्रगती थांबू शकते. हे घराच्या प्रमुख व्यक्तीच्या आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरू शकते.
पश्चिम दिशा (West Wall): घरातील पश्चिम दिशा ही काळाची दिशा असल्याचे सांगितले जाते. या दिशेत घड्याळ लावल्याने जीवनातील वेळ आणि वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
मुख्य दरवाजा (Main Gate): घरातील मुख्य दरवाजा किंवा त्याच्यावर घडी लावणं तणाव आणि नकारात्मक ऊर्जेला कारणीभूत ठरते. यामुळे घरात प्रवेश करतेवेळी नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
हे ही वाचा: Zaheer khan झाला बाबा, लग्नाच्या 8 वर्षानंतर सागरिका घाटगेने दिला बाळाला जन्म, नाव ठेवलं...
घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा
कमल नंदलाल यांच्या मते, 'या' दिशेत घड्याळ लावणं शुभ मानलं जातं.
पूर्व दिशा (East Wall): ही दिशा शुभ असून घरात प्रेमळ वातावरणासाठी कारणीभूत ठरते.
उत्तर दिशा (North Wall): उत्तर दिशेत घड्याळ लावल्यामुळे घरातील सदस्यांसाठी नवीन संधी प्राप्त होतात. तसेच, प्रगती होते.
उत्तर-पूर्व (ईशान्य दिशा) : ही दिशा आर्थिक नुकसानापासून संरक्षण करते आणि समृद्धी आणते.
घड्याळाशी संबंधित Vastu Tips
तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ ठेवू नका: बंद पडलेले किंवा खराब झालेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा वाढवते. अशी घड्याळे लगेच काढून टाका.
घड्याळाचा आकार आणि रंग: नेहमी गोल किंवा अंडाकृती आकाराचे घड्याळ निवडा कारण ते पृथ्वीच्या वेळेशी जुळते. काळ्या रंगाचे घड्याळ टाळा आणि लाल, सोनेरी, पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे घड्याळे लावणं शुभ मानलं जातं.
तीक्ष्ण पॉइंटर्स टाळा: घड्याळाचे पॉइंटर्स सौम्य असावेत आणि त्यांच्या आवाज मधुर असावा.
वेळेचे महत्त्व
कमल नंदलाल यांनी सांगितल्याप्रमाणे, घड्याळ केवळ वेळच सांगत नाही तर ते तुमच्या जीवनाची दिशा देखील प्रभावित करते. योग्य दिशा आणि योग्य घड्याळ निवडल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि वाईट काळ टाळता येतो.
टीप: ही माहिती ज्योतिषशास्त्र, वास्तू शास्त्र आणि त्याभोवती असलेल्या श्रद्धा आणि युक्तिवादांवर आधारित आहे. एका ज्योतिषाच्या हवाल्याने आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत. मुंबई Tak अशा समजुती आणि युक्त्यांना समर्थन देत नाही.
ADVERTISEMENT
