Maharashtra Weather Today : मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरडं, उष्ण व दमट हवामानाची स्थिती पाहायला मिळत आहेत. तसच काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वारा आणि मध्यम स्वरुपाचा पाऊसही कोसळला आहे. मराठवाडा, विदर्भासह कोकणात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. काल गुरुवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
ADVERTISEMENT
तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून बांधण्यात आला होता. अशातच आज शनिवारी 19 एप्रिल 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती काय असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हे ही वाचा >> ससूनच्या अहवालामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा? निष्कर्षात नेमकं म्हटलंय तरी काय?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालनामध्ये कोरडं हवामान असणार आहे. तर पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा >> सासू अनिता जावयासोबत का पळाली? खुद्द राहुलने केला खळबळजनक खुलासा; म्हणाला, "मी लग्नासाठी..."
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये हवामान विभागाकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार/संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील, असा रिपोर्ट हवामान विभागाने दिला होता. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 24°C च्या आसपास असेल, असही शक्यता वर्तवली होती.
ADVERTISEMENT
