नवी दिल्ली: आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना प्रतिष्ठित बिझनेस टुडे इंडिया बेस्ट सीईओ पुरस्कार समारंभात 'बिझनेस आयकॉन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमात सहभागी झालेल्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना 'इम्पॅक्ट आयकॉन ऑफ द इयर' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
ADVERTISEMENT
57 वर्षीय कुमार मंगलम बिर्ला यांनी हिंडाल्कोच्या नवीन रूपाचे अनावरण केले, ज्यामुळे धातू क्षेत्रात नवीन शक्यतांना चालना मिळाली. त्यांनी त्यांच्या अॅल्युमिनियम आणि तांबे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 45,000 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली. बिर्ला यांना त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्व कौशल्यामुळे या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा>> Personal Finance: 15 वर्षांच्या नोकरीत केला SIP चा जुगाड तर 40 व्या वर्षी घरबसल्या दरमहा 1.5 लाख रुपये
इंडिया टुडे ग्रुपचे अध्यक्ष अरुण पुरी यांनीही या प्रसंगी भाषण केले आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन सुधारणांची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात 16 प्रमुख व्यावसायिक नेत्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.
कुमार मंगलम बिर्ला हे भारताच्या भविष्याबद्दल केवळ आशावादी नाहीत तर त्यांना आत्मविश्वासही आहे. जागतिक अनिश्चितता वाढत असताना आणि अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष म्हणतात की, भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर जोरदारपणे वाटचाल करत आहे. बिर्ला यांच्या मते, हे फक्त आकडे नाहीत.
2047 पर्यंत भारत विकसित देश होण्याच्या मार्गावर आहे का असे विचारले असता, बिर्ला म्हणाले, "नक्कीच. भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे जी दरवर्षी 6-7% दराने वाढते, जी एक महत्त्वाची कामगिरी आहे. जगाला आपल्यकडे हा सुवर्णकाळ म्हणून पाहील. धोरणात्मक स्थिरता, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि सकारात्मक व्यावसायिक वातावरण दीर्घकालीन विकासासाठी पायाभूत सुविधा तयार करत आहेत."'
हे ही वाचा>>Personal Finance: महिन्याला 250 रुपये गुंतवून कमवा 35 लाख, SBI ची सॉलिड SIP
BT MindRush 2025: बिर्लाकडून 5 खास व्यवसाय टिप्स
BT MindRush 2025 मध्ये एका विशेष सत्रात 'बिल्डिंग इंडियाज नेक्स्ट ग्लोबल कॉंग्लोमेरेट' या विषयावर बोलताना, कुमार मंगलम बिर्ला यांनी त्यांच्या अनुभवांमधून पाच महत्त्वाचे व्यावसायिक मंत्र सांगितले.
ADVERTISEMENT
