LPG Price Hike: मोदी सरकारने दिला जोरदार झटका, घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ

LPG Price Hike 50 Rs: सोमवारी देशाला महागाईचा मोठा फटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमती तब्बल 50 रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

07 Apr 2025 (अपडेटेड: 07 Apr 2025, 06:11 PM)

follow google news

नवी दिल्ली: देशातील नागरिकांना नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा मोठा झटका बसला आहे. कारण घरगुती LPG सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. सरकारने 14 किलोच्या घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 50 रुपयांनी वाढ केली आहे. यानंतर, उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या LPG सिलेंडरची किंमत 503 रुपयांवरून 553 रुपये होणार आहे आणि उज्ज्वला योजनेव्यतिरिक्त, असलेल्या सिलेंडरची किंमत ही 803 रुपयांवरून 853 रुपये झाली आहे.

हे वाचलं का?

पेट्रोलियम मंत्र्यांनी केली किंमती वाढीची घोषणा

माध्यमांशी बोलताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढत आहेत आणि येथील किंमती कमी होत आहेत. आम्ही LPG च्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.' येत्या काही दिवसांत आम्ही त्याचा आढावा घेऊ असे ते म्हणाले.

हे ही वाचा>> Dharashiv : शिंदे कॉलेजच्या फेअरवेलमध्ये 'त्या' विद्यार्थीनीचा अचानक झाला मृत्यू! भाषण सुरु असताना काय घडलं?

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी पुढे म्हणाले की, 'स्वयंपाकाच्या गॅसच्या बाबतीत आपण खूप प्रगती केली आहे आणि आता आपल्याकडे उज्ज्वला योजना देखील आहे, ज्याचे 10 कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. आज आपल्या बंधू-भगिनींना लाकूड, शेण आणि इतर गोष्टींपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) गरीब महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणजेच LPG मिळावे म्हणून मोफत LPG सिलिंडर दिले जातात.' असं ते यावेळी म्हणाले.

1 ऑगस्ट 2024  पासून किंमती होत्या स्थिर

गेल्या काही महिन्यांत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झाला असला तरी, 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत शेवटचा बदल गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आयओसीएलनुसार, सध्या दिल्लीत LPG सिलिंडरची किंमत 803 रुपये आहे. मुंबईत ही किंमत 802.50 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 818.50 रुपये आहे.

हे ही वाचा>> Viral Video: रस्त्यावरच कोंबड्या खरेदी केलेल्या ट्रक मालकाला अनंत अंबानींनी किती पैसे दिले?

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवलं

सोमवारी (7 एप्रिल) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्काबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला. याअंतर्गत पेट्रोल-डिझेल उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तथापि, पेट्रोलियम मंत्र्यांनी असे म्हणत चित्र स्पष्ट केले आहे की, 'मी हे स्पष्ट करतो की याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. ते म्हणाले की, अलिकडच्या काळात पेट्रोलची आंतरराष्ट्रीय किंमत प्रति बॅरल $60 किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर कच्च्या तेलाच्या किंमतीइतकी झाली आहे.

हरदीप सिंग पुरी यांनी असेही स्पष्ट केले की पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा उद्देश ग्राहकांवर भार टाकणे नाही, तर अनुदानित गॅसच्या किमतींमुळे तेल विपणन कंपन्यांना झालेल्या 43,000 कोटी रुपयांच्या नुकसानाची भरपाई करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

    follow whatsapp