Pink Rickshaw Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा होणार आहे. या योजनेची चर्चा असताना राज्य सरकारने गरीब महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. या योजनेचे नाव पिंक रिक्षा योजना आहे? ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचा फायदा कुणाला होणार आहे? हे जाणून घेऊयात. (ajit pawar announce new scheme for women pink rickshaw yojana mukhmantri ladki bahin yojana )
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेनंतर आता उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरीब महिलांना मिळणार आहे. ज्या गरीब महिला आहेत, त्या महिलांना या पिंक रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
कुणाला मिळणार लाभ?
उप मुख्यमंत्री अजित पवारांनी आज पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील 17 शहरातील 10 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.ज्या महिला गरीब आहेत, त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
हे ही वाचा : Sharad Pawar: बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story
महिलांना पिंक रिक्षा कशी मिळणार?
ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्या महिलांना ही पिंक रिक्षा मिळणार आहे. विशेष म्हणजे या पिंक रिक्षाची 20 टक्के रक्कम ही सरकार भरणार आहे. आणि 10 टक्के रक्कम ही अर्जदार महिलांना भरावी लागणार आहे. उरलेली 70 टक्के रक्कम बँकेच्या लोनच्या माध्यमातून भरावी लागणार आहे.
कोण ठरणार पात्र?
ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, त्या चा योजनेस पात्र ठरणार आहेत. या महिलांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र रहिवासी पुरावाही आवश्यक आहे. तसेच या महिलांकडे आधार कार्ड, मोबईल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे.
कुठे अर्ज कराल?
खरं तर अद्याप सरकारकडून या योजनेची घोषणाच करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचे आहेत? याबाबत अधिक माहिती सरकारकडून देण्यात आली नाही आहे. मात्र लवकरच याबाबतची माहिती समोर येणार आहे.
हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana: अर्ज भरलेल्या महिलांसाठी मोठी बातमी, सरकारचा 'तो' निर्णय अन्...
महिलांच्या खात्यात पैसै कधी जमा होणार?
राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पहिला हफ्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे वा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे.
ADVERTISEMENT