Gender Change Viral News : उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर येथील एका क्रांतिकारी कुटुंबात जन्मलेले शरद याआधी शरद नव्हते, तर सरिता सिंग होते. काकोरी येथील अमर नायक ठाकूर रोशन सिंग यांच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. आज तिच सरिता सिंग शरद सिंग बनले आहेत. गालावर दाढी आणि आवाजातही कठोरपणा आहे. इतकच नव्हे तर त्यांनी सविता सिंगसोबत लग्नही केलं आहे.
ADVERTISEMENT
आता सविता आई बनली असून शरद पिता बनला आहे. सरितापासून शरद बनणे...पुन्हा पती बनणं..ही कहाणी पुढे जाऊन पिता बनण्यापर्यंत पोहोचली आहे. पिता झाल्यानंतर शरद सिंग खूप आनंदी आहेत. पती-पत्नी दोघेही या क्षणाला साजरा करत आहेत. बुधवारी सविताला प्रसुतीसाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे ऑपरेशनंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला आहे.
मुलीपासून मुलगा का बनला शरद?
शरदचा जन्म मुलगी म्हणून झाला होता. पण त्यांना मुलगा का बनावं लागलं? खरंतर शरदच्या मनातील भावना पुरुषांसारख्या होत्या. त्यांनी मुलीसारखे कपडे घालणे, छोटे केस ठेवणे पसंत येत होतं. या गोष्टींकडे पाहता त्यांची घरी, शेजारी आणि समाजात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. शरदने ठरवलं की तो मुलासारखा जीवन जगेल.पायाने अपंग असलेला शरद जो याआधी सरिता होता, त्याने 2021-22 मध्ये त्याचं जेंडर बदलण्याची प्रक्रिया सुरु केली. लखनऊमध्ये हार्मोन थेरेपीच्या माध्यमातून त्यांनी गालावर दाढी वाढवली. आवाजात बदल केला.
हे ही वाचा >> उज्ज्वल आणि नीलूला 'अशी' सुचली देशी पॉर्नची idea, तरुणींना द्यायचे प्रचंड पैसे अन्...
सरिताने इंदौरला जाऊन 2023 मध्ये सर्जरी केली. आता तो पुरुष झाला आहे. 27 जून 2023 ला त्यावेळचे जिल्हाधिकारी उमेश प्रताप सिंग यांनी सवितापासून शरद सिंगच्या नावाने जेंडर बदलण्याचा प्रमाणपत्रही जारी केलं. शरीर आणि दस्तावेज दोन्हीमुळे आता सविता शरद बनली होती.
शरदने लिंग बदल केल्यानंतर तुफान चर्चा झाली. जेव्हा त्यांनी त्यांचे महिला मित्र सरिता सिंगसोबत लग्न केलं. सरिता पीलीभीत जिल्ह्यातील बीसलपूरच्या दुवाह गावातील रहिवासी आहे. त्यांनी शरद सिंग यांच्यासोबत लग्न केलं. दोघेही या लग्नामुळे खूप आनंदी होते.
हे ही वाचा >> Pune: स्वत:ला दोन मुलं असतानाही गजाननने पुण्यातील 'त्या' महिलेच्या मुलाचं का केलं अपहरण?
ADVERTISEMENT
