"वैश्या हो आणि धंदा कर...", संतापलेल्या बायकोनं नवऱ्याचा केला खून, प्रियकराने बेडखाली साप ठेवला अन्...

Wife Kills Husband Viral News : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सौरभ हत्याकांड नुकतचं घडलं. पण यापेक्षाही धक्कादायक आणि खरतनाक घटना मेरठमध्ये घडलीय.

Wife Kills Husband Crime News

Wife Kills Husband Crime News

मुंबई तक

• 04:52 PM • 17 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रिकराच्या मदतीने बायकोनं केला नवऱ्याचा खून

point

प्रियकराने मृतदेहाजवळ ठेवला खतरनाक साप

point

त्या रुममध्ये नेमकं घडलं तरी काय?

Wife Kills Husband Viral News : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सौरभ हत्याकांड नुकतचं घडलं. पण यापेक्षाही धक्कादायक आणि खरतनाक घटना मेरठमध्ये घडलीय. एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहावर दहावेळा सर्पदंश केला. अमित असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अमितची पत्नी रविताने पतीच्या हत्येमागचं कारण सांगितल्यावर पोलिसांनाही हादरा बसला. पतीच्या हत्येसाठी मोठा कट रचल्याची माहितीही रवितानो पोलिसांना दिली.

हे वाचलं का?

पतीची हत्या केल्यानंतर रविताने पोलिसांना जबाब देताना सांगितलं, माझा पती माझ्यासोबत दररोज भांडण करायचा. मला मारायचा. मला शिविगाळ करायचा. माझ्याशी अश्लील बोलायचा. तुला वेश्या बनवून धंदा सुरु करेन, अशाप्रकारच्या धमक्याही मला द्यायचा. या सर्व प्रकारामुळे मी खूप नैराश्यात गेली होती. त्यानंतर मी माझा प्रियकर अमरला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने मला पतीची हत्या करण्यासाठी सांगितलं. मी त्याला मारेन, तू मला साथ दे, असं तो मला सांगायचा. माझा पती माझ्यासोबत हिंसक पद्धतीने वागायचा आणि माझा अपमानही करायचा. याच गोष्टीला कंटाळून मी माझ्या प्रियकराच्या मदतीने अमितच्या हत्येचा कट रचला. 

हे ही वाचा >> Waqf Act: आताची सगळ्या मोठी बातमी, मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

पत्नीने पतीची कशी केली हत्या?

मी माझ्या पतीचं तोंड आणि हात पकडलं. त्यानंतर माझा प्रियकर अमरने माझ्या पतीचा गळा दाबून हत्या केली. दरम्यान, अमितचा खून करण्यात प्रियकर अमरला मदत केल्याचं रविताने कबूल केलं. अमितच्या हत्येच्या वेळी त्यांचं तोंड दाबून हात पकडलं, जेणेकरून त्याचा ओरडण्याचा आवाज येणार नाही, अशी माहितीही रविताने पोलिसांना दिली. 

हे ही वाचा >> 'नवरा म्हणाला तू जावयासोबतच पळून जा, मी गेले पळून...', सासूचा 'तो' VIDEO आला समोर!

मृतदेहाजवळ साप कुठून आला?

"साप कुठून आणला याबाबत मला माहित नाही. अमरने साप आणला असेल आणि बेडखाली मृतदेहाच्या बाजूला ठेवला. जेणेकरून असं वाटेल की सर्पदंशाने अमितचा मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर असा प्लॅन  केला की, ही हत्या नैसर्गिक मृत्यू वाटेल. यासाठी सापाला मृतदेहाच्या बाजूला सोडलं", अशी माहिती रविताने पोलिसांना दिली. परंतु, अमितचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं. त्यानंतर रविता आणि अमरने गुन्ह्याची कबुली दिली.

    follow whatsapp