मुलीला दाखवलं पण लग्न झालं विधवा सासूसोबत! भाऊ आणि वहिनीने तरुणाला फसवलं, नेमकं घडलं तरी काय?

Fake Bride Case Viral News : मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडल्यानं सर्वांनाच मोठा हादरा बसला आहे. ब्रम्हपुरी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने (अजीम) आरोप केला आहे की, त्याला त्याचाच भाऊ आणि वहिनीने फसवलं.

Todays Crime Latest News

Todays Crime Latest News

मुंबई तक

• 06:46 PM • 17 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीच्या आईसोबत तरुणाचं लावलं लग्न, पण घडलं...

point

जेव्हा वधूच्या नावऐवजी समोर आलं दुसऱ्या महिलेचं नाव...

point

"मी मानसिकरित्या तुटलो आहे..."

Fake Bride Case Viral News : मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडल्यानं सर्वांनाच मोठा हादरा बसला आहे. ब्रम्हपुरी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने (अजीम) आरोप केला आहे की, त्याला त्याचाच भाऊ आणि वहिनीने फसवलं. मुलगी दाखवून अजीमला लग्नासाठी बोलावण्यात आलं. पण त्यानंतर अजीमचं लग्न त्या मुलीच्या विधवा आईसोबत लावलं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर अजीमने थेट पोलिसांत धाव घेतली आणि न्याया मिळवून देण्याची मागणी पोलिसांना केली. 

हे वाचलं का?

मुलीच्या आईसोबत तरुणाचं लावलं लग्न आणि त्यानंतर घडलं...

तारापूर परिसरात राहणाऱ्या अजीम नावाच्या तरुणाने एसएसपी कार्यालयात पोहचून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. तरुणाने म्हटलं की, माझ्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यामुळे मी भाऊ नदीम आणि वहिनी शायदासोबत राहत होतो. ईदच्या दिवशी 31 मार्चला वहिणीने मला फाजलपूर येथे बोलावलं होतं. त्यावेळी असं ठरलं होतं की, माझं लग्न शायदाची भाची मंतशासोबत केलं जाईल. पण त्यानंतर मी त्यांच्या घरी पोहोचलो आणि मुलीला पाहून लग्नासाठी होकार दिला.

हे ही वाचा >> प्रेयसीला भेटायला घरी गेला, घरच्यांनी मुलीच्या हाती दिलं ब्लेड अन् प्रियकराचं गुप्तांगच कापलं...

जेव्हा वधूच्या नावऐवजी समोर आलं दुसऱ्या महिलेचं नाव

अजीमने याप्रकरणाबाबत म्हटलं की, फाजलपूरच्या मस्जिदमध्ये जेव्हा मौलाना लग्नाचे विधी करत होते, तेव्हा मला (अजीम) माहिती झालं की, माझं लग्न मंतशासोबत नाही, तर मंतशाची आई ताहिरासोबत होत आहे. ज्या विधवा असून माझ्यापेक्षा वयाने 25 वर्ष मोठ्या आहेत. जेव्हा मी याला विरोध केला, तेव्हा माझा भाऊ आणि वहिणीने मारहाण केली. जर मी काही म्हणाले, तर माज्यावर खोटी रेप केस लावली जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली. 

हे ही वाचा >> Waqf Act: आताची सगळ्यात मोठी बातमी, मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

"मी मानसिकरित्या तुटलो आहे..."

असिमने म्हटलं की, त्याला सतत भीती दाखवून धमकवलं जात होतं. तो मानसिकरित्या खूप खचला आहे आणि आता न्यायासाठी एसएसपी कार्यालयात पोहोचला आहे. माझ्यासोबत जे घडलं ते इतर कोणासोबत घडू नये. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशीच माझी इच्छा आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन ब्रम्हपूरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

    follow whatsapp