SSC Result 2025:  दहावीचा निकाल पाहण्याची तयारी करून ठेवा, इथे पाहू शकता Result

SSC Result 2025 Result Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

SSC Result 2025 Latest News

SSC Result 2025 Latest News

मुंबई तक

• 08:02 PM • 17 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार?

point

कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता दहावीचा निकाल?

point

SSC च्या निकालाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

SSC Result 2025 Result Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात सुरु असून विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच मे मध्ये दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. तत्पूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मे महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.  

हे वाचलं का?

मागील वर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यामध्ये 8,64,120 मुलांचा समावेश होता. तर 7,47,471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर दहावीच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान, यंदाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. परंतु, दहावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती आहे.

हे ही वाचा >> प्रेयसीला भेटायला घरी गेला, घरच्यांनी मुलीच्या हाती दिलं ब्लेड अन् प्रियकराचं गुप्तांगच कापलं...

या वेबसाईट्सवर पाहू शकता दहावीचा निकाल

  • https://mahresult.nic.in
  • https://sscresult.mkcl.org  
  • https://sscresult.mahahsscboard.in
  • https://results.digilocker.gov.in

हे ही वाचा >> पुण्याच्या बिझनेसमनला 'तो' मोह पडला महागात, बिहारमध्ये कोणी घेतला जीव?

मंत्री आशिष शेलार यांनी MSBSHSE आणि आयटी विभागासोबत नुकतीच बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, लाखो विद्यार्थी जेव्हा बोर्डाच्या वेबसाईटवर लॉग इन करतात, तेव्हा वेबसाईटवर लोड येतो. यामुळे तांत्रिक अडचणी आणि ओव्हरलोडची स्थिती निर्माण होते. त्यांनी अधिकाऱ्यांना वेबसाईटची क्षमता वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षेबाबत उपाययोजना राबवण्यासाठी निर्देश दिले होते. 

    follow whatsapp