Ram Mandir Pran Pratishtha Live Updates: अयोध्या: अयोध्येतील (Ayodhya) नवीन मंदिरात आज (22 जानेवारी) सोमवारी अभिजीत मुहूर्ताच्या दरम्यान दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद आणि 12:30 वाजून 32 सेकंदादरम्यान प्रभू रामाची (Ram) प्राणप्रतिष्ठा होईल. याच 84 सेकंदाच्या मुहूर्तावर मूळ धार्मिक विधी पार पाडले जातील. आज सकाळी सर्वात आधी दैनिक मंडपात त्या देवतांची पूजा होईल ज्यांना आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विशेष मंत्रांचा जप केला जाईल. त्यानंतर प्रभू रामाला स्नान घालण्यात येईल. त्यानंतर औपचारिक श्रृंगार होईल. (ayodhya ram mandir prana pratishtha ram janmabhoomi abhijeet muhurta of 84 seconds all program on one click)
ADVERTISEMENT
सकाळी 11 ते 12 या वेळेत चारही वेदांतील मंत्रांचा गुंजन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा सोहळ्याचे यजमान असतील. त्यांच्या हस्ते 84 सेकंदांच्या अभिजीत मुहूर्तावर श्री राम लल्लाच्या देवतेचा अभिषेक होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास महाराजही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा>> Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live: अयोध्या नगरी सजली, पाहा कोण-कोण VVIP पोहोचले राम मंदिरात
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा संपूर्ण सोहळा नेमका कसा असेल?
- 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता राम लल्लाच्या अभिषेक विधीला सुरुवात होणार आहे.
- प्राणप्रतिष्ठेची मुख्य पूजा अभिजीत मुहूर्तावर होईल.
- काशीचे अभ्यासक गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ निश्चित केली आहे.
- हा कार्यक्रम पौष महिन्याच्या द्वादशी तारखेला (22 जानेवारी 2024) अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशामध्ये होईल.
- 84 सेकंदाची शुभ वेळ: शुभ वेळ 12:29 मिनिटे 08 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद असेल.
- म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त हा फक्त 84 सेकंद आहे.
- श्री राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, जे पूजाविधीचे यजमान आहेत.
- काशीचे प्रसिद्ध वैदिक आचार्य गणेश्वर द्रविड आणि आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली 121 वैदिक आचार्यांकडून हा विधी पार पडणार आहे.
- या काळात 150 हून अधिक परंपरांचे संत-धर्माचार्य आणि 50 हून अधिक आदिवासी, गिरीवासी, तटवासी, द्विपवासी आणि आदिवासी परंपरांचे संत आणि धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत.
- सर्व पूजाविधी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांचं भाषण होईल.
- पीएम मोदी चार तास अयोध्येत
- पंतप्रधान मोदी सोमवारी चार तास अयोध्येत राहणार आहेत. सकाळी 10:25 वाजता ते अयोध्या विमानतळावर उतरतील आणि 10:55 वाजता रामजन्मभूमीला पोहोचतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर ते 1 वाजता उपस्थितांना संबोधित करतील.
- 2:10 वाजता कुबेराचे दर्शन घेऊन दिल्लीला परतील.
- सायंकाळी दिव्यांची रोषणाई: अभिषेक सोहळा पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली जाईल.
- शरयू नदीच्या काठावरील मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. रामलला, कनक भवन, हनुमानगढ़ी, गुप्तरघाट, शरयू तट, लता मंगेशकर चौक, मणिराम दास छावणीसह 100 मंदिरे, प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणी दिवे लावले जातील.
हे ही वाचा>> Ram Mandir : 22 जानेवारीच्या सुट्टीबद्दल उच्च न्यायालयाने दिला निकाल, कोर्टात काय झालं?
असा हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे. ज्यासाठी अयोध्येत पंतप्रधान मोदींसह अनेक VVIP आणि सेलिब्रिटी येणार आहेत. त्यामुळे अवघ्या अयोध्येत प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT