Govt Job : 'इंजिनीअर्स'साठी गुड न्यूज! 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये सरकारी नोकरीची संधी! 

रोहिणी ठोंबरे

12 Nov 2024 (अपडेटेड: 12 Nov 2024, 03:54 PM)

Govt Job vacany 2024 : 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये सध्या भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये सध्या भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Govt Job vacany 2024 : 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये सध्या भरती होत आहे. डिप्लोमा ट्रेनी (Electrical) या पदावर 600 जागा, डिप्लोमा ट्रेनी (Civil) पदावर 66 जागा, ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) पदावर 79 जागा, ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) पदावर 35 जागा आणि असिस्टंट ट्रेनी (F&A) या पदावर 22 आहेत. अशा एकूण 802 जागांवर इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job vacany 2024 Good News for Engineers government job opportunity in Power Grid Corporation of India)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  • पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  • पद क्र.3: 60% गुणांसह पदवीधर/BBA/BBM/BBS
  • पद क्र.4: Inter CA/Inter CMA
  • पद क्र.5: 60% गुणांसह  [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Maharashtra Assembly Elections 2024 : Voter list मध्ये तुमचं नाव आहे की नाही... कसं शोधायचं? वाचा एका क्लिकवर

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून,

  • पद क्र.1 ते 4 : General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
  • पद क्र.5 : General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही] शुल्क आकारले जात आहे.

अधिक माहितीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.powergrid.in/ वरून माहिती मिळवू शकता.

    follow whatsapp