चंद्रयान 3 (chandrayaan 3) ने नुकताच चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर चंद्रयान 3 ने फोटो पाठवू का? असा आशयाचे ट्विट केले होते. या ट्विटनंतर आता चंद्रयान 3 ने त्याच्या लँडर कॅमेरात टिपलेले चंद्र आणि पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. या फोटोत निळ्या पृथ्वीवर सफेद रंगाच्या ढगांची चादर दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत चंद्राचा पृष्ठभाग कॅमेरात कैद झाला आहे. हे दोनही फोटो चंद्रयान 3 च्या लँडरमध्ये बसवलेल्या कॅमेराने टिपले आहेत. (chandrayaan 3 camera took new image of earth and moon know about it)
ADVERTISEMENT
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने 14 जुलैला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून चंद्रयान 3 चे उड्डाण केले होते. या उड्डाणानंतर 5 ऑगस्टला चंद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. यानंतर चंद्रयानच्या लँडरमध्ये लावण्यात आलेल्या (Lander Imager- LI) लँडर इमेजर कॅमेरेद्वारे पृथ्वीचा फोटो काढला आहे. या फोटोत निळ्या पृथ्वीवर सफेद ढगांची चादर दिसते आहे. याआधी 5 ऑगस्टला चंद्रयानमध्ये लावण्यात आलेल्या दुसऱ्या कॅमेराने चंद्राचा फोटो पाठवला होता.चंद्रयानवर लावण्यात आलेल्या लँडर
होरिझोंटल वेलोसिटी कॅमेरेद्वारे (Lander Horizontal Velocity Camera-LHVC)चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवले होते.
हे ही वाचा : PM Modi Speech Manipur: अखेर पंतप्रधान मोदी मणिपूर हिंसाचारावर बोलले, पण…
चंद्रयानमध्ये लावण्यात आलेला LI कॅमेरा गुजरामध्ये असलेल्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) बनवला आहे. LHVC हा कॅमेरा बंगळूरूच्या लॅबोरेट्री फॉर इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम (LEOS)ने बनवला आहे.LHVC हा लँडरच्या खालच्या बाजूस लावण्यात आला आहे. तो चंद्राच्या पृष्ठभागावरचे फोटो घेतो.
चंद्रयान 3 सध्या चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत फिरत आहे. त्याची ऑर्बिट 174KM x1437KM आहे. 5 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या पहिल्या कक्षेत चंद्रयान 3 पोहोचले होते. त्यावेळी त्याने चंद्राची पहिला फोटो शेअर केला होता. त्यावेळी चांद्रयान-3 164 x 18074 किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने चंद्राभोवती फिरत होते. जी नंतर 6 ऑगस्ट रोजी 170 x 4313 किमीच्या कक्षेत कमी करण्यात आली.
चांद्रयान-3 चा अजून किती प्रवास बाकी?
14 ऑगस्ट 2023: पहाटे बारा ते 12:04 पर्यंत चौथी कक्षा बदलली जाईल.
16 ऑगस्ट 2023: सकाळी 8:38 ते 8:39 दरम्यान, पाचवी कक्षा बदलली जाईल.याचाच अर्थ, चांद्रयानाचे इंजिन फक्त एका मिनिटासाठी चालू राहतील.
17 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चं प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील.
18 ऑगस्ट 2023: लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग दुपारी 4.45 ते 4.00 दरम्यान होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेच्या उंची कमी होईल.
20 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल रात्री पावणे दोन वाजता डि-ऑर्बिटिंग करेल.
23 ऑगस्ट 2023: लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक राहिले तर लँडर साडेसहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
ADVERTISEMENT