बेडरूममधून आवाज आल्यानंतर दिराला आली जाग! दरवाजा उघडण्याआधीच सुनेनं बॉयफ्रेंडला लपवलं, पण नंतर घडलं...

Boyfriend in Trunk: उत्तरप्रदेशच्या आगरा येथे विवाहित महिलेला भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडची चांगलीच फजिती झाली. बेडरूममध्ये आवाज आल्यानंतर दिराला संशय आला आणि त्यानंतर मोठा कांड झाला.

Love Story Viral News

Love Story Viral News

मुंबई तक

22 Apr 2025 (अपडेटेड: 22 Apr 2025, 05:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेला भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडची चांगलीच फजिती झाली

point

बेडरूममध्ये एका पुरुषाचा आवाज आल्याने महिलेच्या दिराला संशय आला

point

महिलेनं बॉयफ्रेंडला रुममध्ये लपवल्यानंतर नेमकं काय घडलं?

Love Story Viral News :  उत्तरप्रदेशच्या आगरा येथे विवाहित महिलेला भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडची चांगलीच फजिती झाली. बेडरूममध्ये आवाज आल्यानंतर दिराला संशय आला आणि त्यानंतर मोठा कांड झाला. बॉक्समध्ये लपवलेल्या बॉयफ्रेंडला महिलेच्या सासरच्या लोकांनी धू धू धुतलं. दरम्यान, हे खळबळजनक प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी बेडरूममध्ये एका पुरुषाचा आवाज आल्याने महिलेच्या दिराला संशय आला होता. दिराने घरातील अन्य लोकांनी त्या जागेवर बोलावलं आणि दरवाजा नॉक केला. दरवाजा उघडण्याआधी महिलेनं तिच्या प्रियकराला रुममधील एका कपड्यांच्या बॉक्समध्ये लपवलं. घरातील लोकांनी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो दिसला नाही.

हे ही वाचा >> Today Gold Price: विषयच संपला... ज्याचा विचार कधीही केला नव्हता तेच झालं, सोन्याचा आजचा भाव पाहूनच जाल हादरून!

महिलेनं बॉयफ्रेंडला रुममध्ये लपवल्यानंतर नेमकं काय घडलं?

पण काही वेळानंतर घरातल्या लोकांचं लक्ष कपड्यांच्या बॉक्सकडे गेलं. त्यानंतर त्यांना संशय आला आणि त्यांनी बॉक्सचं झाकण उघडलं. त्यानंतर बॉक्समधील कपडे बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्या तरुणाला बाहेर काढलं. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी महिलेच्या प्रियकराला चांगलाच चोप दिला. एवढच नाही, तर गावकऱ्यांनीही त्या तरुणाची धुलाई केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अजय असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तो बाह तहसील येथील रहिवासी आहे. फतेहबाद परिसरात एका गावात राहणाऱ्या महिलेचा पती तिचा मित्र आहे. दोघेही ट्रक ड्रायव्हर आहेत. मागील पाच वर्षांपासून तो महिलेच्या संपर्कात होता. अनेकदा तिला भेटायला आला होता. महिलेनं तिच्या पतीच्या मोबाईलने सर्वात आधी बॉयफ्रेंडला कॉल केला होता. त्यानंतर या दोघांमध्ये बोलणं सुरु झालं होतं. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

हे ही वाचा >> कामाची बातमी: 'या' 7 स्टेप्स फॉलो करा, आता घर बसल्याच मिळवा Driving Licence

    follow whatsapp