अज्ञात व्यक्तीने धावत्या एक्स्प्रेसमध्ये फेकला दगड! आजीसोबत प्रवास करणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Solapur Railway Incident : कर्नाटक येथून विजापूर ते रायचूरला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना घडलीय. पॅसेंजर रेल्वे सोलापूरकडे परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने रेल्वेच्या डब्ब्यात दगड फेकला.

Solapur Railway Incident Latest Update

Solapur Railway Incident Latest Update

मुंबई तक

• 09:51 AM • 21 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अज्ञात व्यक्तीने धावत्या रेल्वेत भिरकावला दगड

point

डोक्यात दगड लागल्याने चिमुकलीचा मृत्यू

point

रेल्वे प्रवासात नेमकं घडलं तरी काय?

Solapur Railway Incident : कर्नाटक येथून विजापूर ते रायचूरला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना घडलीय. पॅसेंजर रेल्वे सोलापूरकडे परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने रेल्वेच्या डब्ब्यात दगड फेकला. हा दगड आजीसोबत प्रवास करणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीच्या डोक्यात लागला आणि ती गंभीर जखमी झाली. परंतु, उपचाराआधीच या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आरोही अजित कांगरे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथून विजापूर ते रायचूरला जाणाऱ्या पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याची धक्कादायक घटना घडली. अज्ञात व्यक्तीने रेल्वेत दगड मारल्याने तो दगड चार वर्षीय मुलीला लागला. त्यानंतर जखमी झालेल्या मुलीचा सोलापुरात उपचारापूर्वी मृत्यू झाला.

हे ही वाचा >> Today Gold Rate : अहो राव, काय ते सोन्याचे भाव! सोनं पुन्हा कडाडलं, आजचे दर वाचून सर्वांनाच बसलाय धक्का

आरोही अजित कांगरे (वय 4 वर्षे, राहणार होणसळ, तालुका उत्तरसोलापूर) ही आपल्या आजीसोबत कर्नाटक येथून विजापूर ते रायचूर पॅसेंजर रेल्वेने सोलापूरला येत होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास होडगी परिसरातून पॅसेंजर रेल्वे जात असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रेल्वेत जोराने दगड मारला. तो दगड आरोही हिच्या डोक्याला लागून ती गंभीर जखमी झाली. 

सोलापुरात रेल्वे पोहोचताच आरोहीला उपचारासाठी शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच आरोहीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सोलापूर सिव्हिल रुग्णालयात रेल्वे पोलीस दाखल झाले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती कळताच होनसळ गावावर एकच शोककळा पसरली आहे. रेल्वेला दगड मारणारा कोण? याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

हे ही वाचा >> Maharashtra Weather : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीत पावसाच्या सरी कोसळणार! पण 'या' भागात उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार

    follow whatsapp