Girl Dance Video: क्लबमध्ये तरुणीचा ‘असा’ डान्स… एवढा का झालाय Viral?

मुंबई तक

• 12:38 PM • 22 Dec 2023

काही लोकांना डान्य करण्याचा प्रचंड नाद असतो, गाणं कोणतंही असो, ते लगेच ताल धरणारच. असा डान्स एक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, आणि तो व्हिडीओ अनेक शेअर करत अनेकांनी त्याच्यावर कौतुकाच्या कमेंटही केल्या आहेत.

dance done girl chunri Chunri song went viral girl was praised on social media

dance done girl chunri Chunri song went viral girl was praised on social media

follow google news

Viral Video : डान्स करणं हा अनेकांचा प्रचंड आवडीचा छंद असतो. कधी कोठे गाणं वाजलं की, अनेकजण लगेच ताल धरतात. असाच ताल धरत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी बॉलीवूडच्या (Bollywood Song) एका गाण्यावर क्लब डान्स (Club Dance) करताना दिसत आहेत. मात्र तिने धरलेल्या डान्सच्या ठेक्यामुळे आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या मुलीच्या डान्समुळेच हा व्हिडीओ पुन्हा पाहणं आणि तो फॉरवर्ड करणं कोणाला आवरता आलं नाही.

हे वाचलं का?

व्हिडीओ तुफान व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डान्स करणारी मुलगी अगदी बिनधास्त आणि बेधडक नाचत आहे. ती मुलगी चुनरी चुनरी या गाण्यावर डान्स करत आहे, मात्र तिच्या हावभावामुळे ती आता तुफान व्हायरल झाला आहे. तिच्या डान्सच्या अदामुळेच अनेक जण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत, आणि तो अनेक जण शेअर करत आहेत. त्यावर अनेक जण प्रतिक्रियाही देत आहेत.

 

हे ही वाचा >> तोंडातच सुतळी बॉम्ब फोडून केली आत्महत्या, तरुणाने का उचललं टोकाचं पाऊल?

फक्त कौतुक आणि कौतुक

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर @Kavvyia नावाच्या यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, आणि अनेक जणांनी त्या मुलीचं कौतुकही केलं आहे. @Kavvyia नावाच्या युजरने शेअर केलेला हा व्हिडीओ काही पहिल्यांदाच व्हायरल झाला आहे असं नाही, याआधीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल होऊन इतरांचंही अनेकजणांनी कौतुक केले आहे.

…तो चुनरी नहीं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बेहद शानदार डान्स, तर आणि एकाने लिहिले आहे की, स्टेज पर आग लगा डाला तर एकाने मजेशीर अशी कमेंट दिली आहे तो म्हणतो की, पण पर इसके पास तो चुनरी ही नहीं है अशा कमेंट देत त्या व्हिडीओचं खूप कौतुक होत आहे.

    follow whatsapp