Manoj Jarange Eknath shinde Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने शिंदे सरकारचा ताण आणखी वाढवला आहे. कारण मनोज जरांगे आता थेट मुंबईत येऊन आंदोलन करणार आहेत. त्याआधी सरकारने जरांगेंच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू केले असून, मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी सरकारने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीसाठी येण्याचे निमंत्रण जरांगेंना दिले. पण, बंद दाराआड चर्चा करण्यास नकार देत जरांगेंनी निमंत्रण फेटाळलं. त्यानंतर शिंदेंनी जरांगेंना फोनही केला. नेमकं काय बोलणं, याबद्दल माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रिया, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची सुरू असलेली कार्यवाही आणि आरक्षणाशी संबंधित इतर मुद्द्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (2 जानेवारी) बैठक बोलावली आहे. 4 वाजता मुंबईत ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रण देण्यात आले. या बैठकीत भूमिका मांडावी, अशी विनंतीही सरकारने केली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी जरांगे यांना पत्र पाठवले आहे. पण, मनोज जरांगेंनी मुंबईत येण्यास नकार दिला.
मनोज जरांगेंनी का दिला नकार?
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी या बैठकीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शंभूराज देसाई यांच्याकडून कळाली. मराठा आरक्षणासंदर्भात बैठक असणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. कार्यक्रम असल्यामुळे जाणं झालं नाही. त्या बैठकीला जाऊन तरी काय करणार? त्यांचा आग्रह होता की, बैठकीला आलंच पाहिजे. फोन पण केले होते.”
हेही वाचा >> “शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा, भुजबळ सुपारी घेतलेला पोपट”, आव्हाड का भडकले?
“मुख्यमंत्र्यांनीही फोन करून सांगितलं की, बैठकीला आलं पाहिजे. समाजाच्या वतीने तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता येईल. पण, मी त्यांना सांगितलं की, आम्ही म्हणणं मांडलेलं आहे. बच्चू कडूंकडे मांडलं आहे. ओएसडीकडे (एकनाथ शिंदे) मांडलेलं आहे. त्यांचे मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन यांच्याकडे. तुम्ही चार शब्द घेतलेले आहेत. दोन शब्द टाका. तिथे आलो तरी मी तेच म्हणणार आहे. इथेही तेच म्हणणार आहे”, असे जरांगे यांनी सांगितलं.
हेही वाचा >> ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयावर बुलडोझर, सांगलीत दोन गटात जबरदस्त राडा
बंद दाराआड चर्चा करण्यास दिला नकार…
मनोज जरांगे म्हणाले, “तिथे चार भिंतीच्या आत चर्चा आहे. चार भिंतीच्या आत चर्चा करण्याऐवजी लाईव्ह करता येईल का? मग जायला हरकत नाही. 20 तारखेचा विषय नाहीये. 20 तारखेला जाणार म्हणजे जाणार. पण, खुली चर्चा केली पाहिजे. तिथे लाईव्ह झालंच नसतं, त्यामुळे सरकारनेच व्हिडीओ कॉन्फरन्सिगची व्यवस्था अंतरवालीतून गेली आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतूनच चर्चा करेन. सरकारची भूमिका नेमकी काय हे आज लक्षात येईल. सरकार सकारात्मक आहे, पण आरक्षण देत नाहीये. आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार”, असे सांगत जरांगे यांनी आपण पायी दिंडी काढण्यावर असल्याचा पुनरुच्चार केला.
ADVERTISEMENT