Kalyan Marathi Family: 'माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय...', फडणवीसांनी एका झटक्यात 'त्या' अधिकाऱ्याला...

मुंबई तक

20 Dec 2024 (अपडेटेड: 20 Dec 2024, 03:45 PM)

कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे.

CM फडणवीसांनी आरोपी अखिलेश शुक्लाला केलं निलंबित

CM फडणवीसांनी आरोपी अखिलेश शुक्लाला केलं निलंबित

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमध्ये हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मारहाण

point

मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मंत्रालयातील अधिकारी

point

आरोपी अखिलेश शुक्लाला शासकीय नोकरीतून निलंबित

नागपूर: कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. कल्याणमधील मराठी कुटुंबाला हिणवत त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला या मंत्रालयातील अधिकाऱ्याला थेट निलंबित करण्यात आलं आहे. (marathi family brutally beaten up in high profile society in kalyan video goes viral chief minister devendra fadnavis suspended accused akhilesh shukla)

हे वाचलं का?

अखिलेश शुक्ला याने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच तापलं. त्यामुळे थेट सभागृहात यावर सरकारला प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आरोपी असलेल्या अखिलेश शुक्ला याचं निलंबन केल्याची घोषणा विधान परिषदेत बोलताना केली आहे. 

कल्याण मारहाण प्रकरण: CM फडणवीसांनी विधान परिषदेत केली मोठी घोषणा

कल्याण मारहाण प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी भांडण झालं आणि त्याठिकाणी मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार काढले, भांडण केलं, मारामारी केली.. त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झालीए. पहिल्यांदा तर मी सांगू इच्छितो की, हा अखिलेश शुक्ला हा MTDC चा कर्मचारी आहे. त्याच्यावर एफआयआर नोंद झाला आहे. पत्नीवर देखील एफआयआर नोंद झाला आहे. दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' 

हे ही वाचा>> शरद पवार आणि PM मोदींच्या भेटीनंतर होणार सगळ्यात मोठा राजकीय धमाका? | Opinion

'अखिलेश शुक्ला याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई इथे करण्यात येत आहे. पुढील कारवाई पोलीस करतील. मुळात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता आणि मराठी माणसाचाच आहे आणि राहील.' 

'कधी-कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं.' 

'कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो की, याचाही विचार करावा लागेल की, मुंबईतील मराठी माणूस हा हद्दपार का झाला? कोणाच्या काळात झाला. का त्या माणसाला मुंबईतून ठाणे, डोंबिवली-कल्याण, वसई-विरार त्या पलीकडे जावं लागलं?'

'मुजोरी करायला हिंमत लागत नाही. तथ्यावर बोललं पाहिजे आपण.. तथ्य हेच आहे की, मुंबईतलं रिडेव्हलपमेंट झालं आणि मराठी माणूस 300 स्क्वेअर फूटमध्ये बसलाय. मोठ्या-मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहतं?'

हे ही वाचा>> Kalyan Marathi Family: 'मराठी लोक भिकारडे...', परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला हिणवत तुफान मारहाण

'पण एक आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की, मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्या राजधानीत देशभरातील टॅलेंट येतं. ते सगळे त्या ठिकाणी राहतात. मुंबईमध्ये 3-4 पिढ्यांपासून राहणारा उ. प्रदेशमधील व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो, सगळे सण-वार साजरा करतो. किंबहुना गणपतीसारखा सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो तेव्हा तो उ. भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पडावा. अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते.' 

'मात्र, हे जे काही लोकं जे माजोरडेपणाने बोलतात त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं. म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधिमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की, कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही.' 

'प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलं आहे. एखाद्याला समाजाल शाकाहार महत्त्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहरी लोकांचं संघटन तयार करू शकतो त्यासाठी योजना तयार करू शकतो. पण अशाप्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही, त्यांना आम्ही राहू देणार नाही.. घर नाकारणं.. अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही.' असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 
 

    follow whatsapp