Gold Price Today : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी (13 सप्टेंबर) सोन्याच्या दरात 200 रुपयांची घट झाली आहे. असे असले तरी देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या पुढे आहे.आणि 22 कॅरेट सोन्याच्या (Gold Rate) 10 ग्रॅमची किंमत सुमारे 67 हजार रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा किरकोळ दर सुमारे 57 हजार रुपये आहे. तर आज चांदी 86,400 रुपये आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेटची किरकोळ किंमत काय आहे? (gold price today on friday 13 September 2024 after the gauri immersion gold and silver rate know the details)
ADVERTISEMENT
देशातील विविध शहरातील सोन्याचे दर काय?
दिल्ली : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 290 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हे ही वाचा : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर तुफान गोळीबार, नेमकं प्रकरण काय?
कोलकत्ता : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूर: जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पाटणा : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नोएडा: नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...'या' दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा?
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT