Gold Price : ग्राहकांची मज्जाच, आज सोनं 'इतक्या' रूपयांनी झालं स्वस्त!

रोहिणी ठोंबरे

08 Oct 2024 (अपडेटेड: 08 Oct 2024, 05:36 PM)

Gold-Silver Price Today : महाराष्ट्रात सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज, मंगळवार 08 ऑक्टोबर 2024 रोजी, राज्यभरात सोन्याचे दर सर्वकालीन उच्चांक गाठत आहेत

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

आज सोन्याच्या किंमतीत कोणते बदल?

point

राज्यभरात सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Today : महाराष्ट्रात सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज, मंगळवार 08 ऑक्टोबर 2024 रोजी, राज्यभरात सोन्याचे दर सर्वकालीन उच्चांक गाठत आहेत. सणासुदींच्या दिवसांत सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी घेतली आहे. सोनं पहिल्यांदाच चक्क 77 हजारांच्या वर गेलं आहे. अशातच आता ग्राहकांसाठी थोडी दिलासा देणारी बातमी आहे. आजच्या सोन्याच्या किंमती जाणून तुम्हाला धक्का बसणार नाही. चला मग सोने-चांदीच्या किंमतीतील हे बदल जाणून घेऊया. (Gold-Silver Price down today 08 october 2024 in maharashtra mumbai Pune what are these rates)

हे वाचलं का?

Goodreturns वेबसाईटनुसार, आज सोन्याच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाही आहेत. हे दर कालच्या एवढेच आहेत. काल म्हणजेच सोमवारी 07 ऑक्टोबर 2024 रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,450 रूपये होता. हाच भाव आजही कायम आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. तर, 22 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 71,000 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 96,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनेाच्या दरात वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रातील बाजारावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हेही वाचा : Big Boss 18: आधी ढारढूर झोपले अन् नंतर... बिग बॉसच्या घरात सदावर्तेंचा विषय हार्ड नाही भलताच!

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,030 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,480 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,120 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Election Results 2024: हरियाणात BJP चा उलटफेर, काश्मीरमध्ये काय घडतंय?

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.


 

    follow whatsapp