Instagram app Down: मुंबई: सोशल मीडिया साइट इंस्टाग्राम सेवा मंगळवारी अचानक डाउन झाली. यानंतर अनेक यूजर्स इंस्टाग्राम वापरू शकले नाहीत. या वेळी अनेक लोकांनी सोशल मीडिया आणि वेबसाइट्स ट्रॅक करण्साठी वेबसाईट Downdetector वर याबाबत रिपोर्ट केलं. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास आउटेज सुरू झालं. (instagram service is down many users are experiencing problems many users shared the meme)
ADVERTISEMENT
सुमारे 1 हजार यूजर्सने Downdetector वर इंस्टाग्राम सुरू नसल्याची तक्रार नोंदवली आणि काही मिनिटांत ही संख्या 2 हजारांवर पोहोचली. यादरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांना Instagram चालवण्यात अडचणी येत आहेत. Insatgram Down संदर्भात अनेक लोकांनी X प्लॅटफॉर्मवर (जुने नाव Twitter) पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.
हे ही वाचा>> Optical Illusion: अस्वल शोधण्यात अनेकांना फुटला घाम! 20 सेकंदात शोधला तर...
Instagram ही लोकप्रिय सोशल मीडिया साईट
Instagram ही आजच्या घडीला एक लोकप्रिय सोशल मीडिया वेबसाईट आहे. अनेक यूजर्स यावर फोटो आणि व्हिडीओ इत्यादी शेअर करतात. या प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम रील्स देखील खूप लोकप्रिय आहे. हे प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे, येथे यूजर्स मेसेज इत्यादी देखील पाठवू शकतात. अनेक सेलिब्रिटी देखील या प्लॅटफॉर्मवर आहेत, याच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटी आणि स्टार्सची जीवनशैली आणि पसंती जाणून घेऊ शकतात.
Instagram आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांनी अद्याप या आउटेजबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. तथापि, याबद्दल काही मीम्स देखील सोशल मीडियावर दिसू लागले, जिथे लोकांनी या आउटेजबद्दल पोस्ट केलं आहे.
हे ही वाचा>> Optical illusion Test: फोटोत दिसणारा प्राणी कोणता? बैल की हत्ती? एका क्लिकवर खरं उत्तर मिळेल
अनेकांनी शेअर केले मीम्स
अनेकांनी मोबाइलचे स्क्रीनशॉट शेअर केले याशिवाय अनेकांनी काही फोटोही शेअर केले आहेत. येथे लोकांनी दाखवले की जेव्हा इंस्टाग्राम डाउन होते, तेव्हा यूजर्स हे एक्स ट्विटरकडे धाव घेतात.
ADVERTISEMENT