Gold Rate : बाईईई! आज सोनं स्वस्त झालं की महाग? 24 कॅरेटच्या किंमतीत मोठे बदल

रोहिणी ठोंबरे

19 Sep 2024 (अपडेटेड: 19 Sep 2024, 12:18 PM)

Gold-Silver Price Today : भारतात सोने खरेदीला एक विशेष महत्त्व आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. अशात, आजचे (19 सप्टेंबर 2024) भाव सविस्तर जाणून घेऊयात.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदीच्या काळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात

point

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Today : भारतात सोने खरेदीला एक विशेष महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या गणेशोत्सवाचा सण थाटात पार पडला. यावेळी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र, या आठवड्याच्या सुरूवातीपासून ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. अशात, आजचे (19 सप्टेंबर 2024) भाव सविस्तर जाणून घेऊयात. (gold-silver prices decrement on 19 september 2024 in maharashtra mumbai know the details)

हे वाचलं का?

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी (18 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 74, 730 रूपये होता. आज यामध्ये 280 रूपयांनी घट झाली असून 74, 450 रूपये किंमत झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 250 रूपयांनी घसरला असून 68,250 रूपये किंमत झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 91,000 रूपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Aishwarya-Abhishek यांच्या घटस्फोटाची तुफान चर्चा! 17 वर्षांत बदलल्या 'या' गोष्टी, चाहत्यांनी केलं नोटीस

आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,250 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 55,840 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,250 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 55,840 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,250 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,450 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 55,840 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,280 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,480 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 55,870 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईत पावसाची उघडीप! 'या' जिल्ह्यांना मुसळधार इशारा; पाहा IMD अलर्ट

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.


 

    follow whatsapp