Gold-Silver Price Today : सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असते. यंदाच्या गणेश चतुर्थीलाही सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र, गणेश चतुर्थीनंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती. पण, आज (20 सप्टेंबर) पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आजचे (20 सप्टेंबर) भाव कितीने वाढले आहेत सविस्तर जाणून घेऊया. (gold-silver prices hike on today 20 september 2024 in maharashtra know the details)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.
हेही वाचा : Gold Price Today: दिवसा दुप्पट, रात्री चौप्पट! सोन्याचे भाव बघूनच ग्राहकांच्या कपाळाला आठ्या; पाहा आजचे दर...
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (19 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 74, 450 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 660 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 75,110 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,250 रूपये होता. जो 600 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 68,850 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 92,500 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,110 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,330 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,110 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,330 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,110 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,330 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,880 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,140 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,360 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Maharashtra Weather: विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा... राज्यातील 'या' जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा!
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT