Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही भागात उकाड्याने थैमान घातल्यानं नागरिकांना उष्णतेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानासह कोरड्या वातावरणाचीही नोंद करण्यात आली.
ADVERTISEMENT
काल रविवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूरमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज बांधण्यात आला होता. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूरमध्ये वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच आज सोमवारी 21 एप्रिलला राज्यातील हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कसं असेल आज राज्यातील सर्व जिल्ह्यांचे हवामान?
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये आज कोरडं हवामान असणार आहे.
हे ही वाचा >> नव्या नवरीला सोडून 'तो' महिला कॉन्स्टेबलसोबत पळाला! बायकोला म्हणाला, "आम्ही दोघे विष पिऊन..."
तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर छत्रपती संभाजी नगर, जालना,बीड, अकोला, नागपूरमध्ये उष्ण व दमट हवामान असणार आहे. तर अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम यवतमाळसाठी प्रादेशिक हवामान विभागाने कोणताही इशारा दिला नाही.
काल रविवारी भारतीय हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर,सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवली होती.
ADVERTISEMENT
