Gold Price: ग्राहकांना दिलासा! सोन्याचे दर ‘इतक्या’ रुपयांनी गडगडले, आज 1 तोळ्याचा भाव काय?

मुंबई तक

• 10:21 AM • 18 Sep 2024

Gold-Silver Price Today : गणेशोत्सवाचा सण थाटात पार पडला. यावेळी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र, या आठवड्याच्या सुरूवातीपासून ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे.

Mumbaitak
follow google news

Gold-Silver Price Today : भारतात सोने खरेदीला एक विशेष महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या गणेशोत्सवाचा सण थाटात पार पडला. यावेळी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र, या आठवड्याच्या सुरूवातीपासून ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. दोन दिवस थोडं का होईना सोन्याच्या किंमती घसरलेल्या पाहायला मिळत आहेत. अशात, आजचे (18 सप्टेंबर 2024) भाव सविस्तर जाणून घेऊयात. (gold-silver prices on 18 september 2024 after ganpati visarjan in maharashtra mumbai know the details)

हे वाचलं का?

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी (16 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 74, 890 रूपये होता. आज यामध्ये 160 रूपयांनी घट झाली असून 74, 730 रूपये किंमत झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 150 रूपयांनी घसरला असून 68,500 रूपये किंमत झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत हजार रूपयांनी घटली असून 91,000 रूपये किंमत झाली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Maharashtra Weather: गणपती विसर्जनानंतर पावसाचा जोर वाढणार? 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,500 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,730 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,050 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,500 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,730 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,050 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,500 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,730 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,050 रूपये आहे

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,530 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,760 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,100 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांनी टेन्शन घेऊच नका! घरात येईल बक्कळ पैसा, पण...


22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.


 

    follow whatsapp