Gold Price Today in Maharashtra : दिवसेंदिवस सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे. चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. पण आता दिवाळी संपताच ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. कारण, सोन्याच्या किंमतीत काहीसा बदल झाला आहे. लग्नसराई जवळ आलेला आहे, अशावेळी सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. चला तर मग सोने-चांदीच्या किंमतीतील हे बदल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver prices Settled down today 5 november 2024 after diwali Mumbai Pune what are the rates of 24 22 and 18 carat gold)
ADVERTISEMENT
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हेही वाचा : Mumbai Crime News : 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करताना डायमंड फॅक्ट्रीच्या मॅनेजरचा मृत्यू! नेमका प्रकार काय?
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (4 नोव्हेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 80,400 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 160 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 80,240 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये होता. त्यातही 150 रूपयांनी घट झाली असून त्याची किंमत 73,550 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 96,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हेही वाचा : Madhurimaraje : ज्यांनी माघार घेतल्यानं कोल्हापुरात राडा, त्या मधुरिमाराजे कोण? किती निवडणुका लढल्या? कारकीर्द कशी?
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,240 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,180 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,240 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,180 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,240 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,180 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,240 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,180 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT