Maharashtra Weather : दिवाळीचा सण अगदी जल्लोषात पार पडला आहे. यावेळी अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. तर, काही भागांत उन्हाचा तडाका पाहायला मिळाला. नागरिक उकाड्याने हैराण झाले. अशा परिस्थितीत अजूनही राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. त्यामुळे थंडीची चाहुल कधी लागणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. (maharashtra weather forecast update 5 november 2024 Unseasonal rainfall alert IMD report Winter season)
ADVERTISEMENT
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (5 नोव्हेंबर 2024) कोकणात पावसाची दाट शक्यता आहे. अशातच आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. तसेच काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : Mumbai Crime News : 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करताना डायमंड फॅक्ट्रीच्या मॅनेजरचा मृत्यू! नेमका प्रकार काय?
त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
थंडीची चाहुल कधी लागणार?
राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल देखील लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान हे 33 अंश सेल्सियस आहे तर किमान तापमान हे 22 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. मात्र येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचे प्रमाण देखील वाढणार आहे.
हेही वाचा : Satej Patil : हुंदका आवरला पण बांध फुटला... सतेज पाटील का रडले? अर्ज मागे घेताना काय घडलं? स्वत: सांगितली इनसाईड स्टोरी
फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलं!
राज्यभरात दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वातावरण दूषित झाले. या प्रदूषित हवेमुळे मुंबई आणि पुण्यात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली आहे. या सगळ्याचा परिणाम हवामानावर होताना दिसतो.
ADVERTISEMENT