Maharashtra Weather : भाऊबीजेच्या दिवशी वादळी संकट? आज 'या' भागांना IMD चा हायअलर्ट

रोहिणी ठोंबरे

• 12:12 PM • 03 Nov 2024

Maharashtra Weather Updates : आज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज... एकीकडे बहीण-भावामध्ये उत्साहाचं वातावरण असताना दुसरीकडे, अस्मानी संकटाची चाहूल लागली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना इशारा!

point

राज्यात थंडी कधी?

point

मुंबईत कसं असेल वातावरण?

Maharashtra Weather Updates : आज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज... एकीकडे बहीण-भावामध्ये उत्साहाचं वातावरण असताना दुसरीकडे, अस्मानी संकटाची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने आज राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तुमच्या शहरात हवामान विभागाचा अंदाज कसा असणार? चला जाणून घेऊया. (maharashtra weather forecast update Today 3 november thunderstorm alert in diwali to these districts IMD report)

हे वाचलं का?

दिवाळीनंतर थंडीची चाहुल लागते पण यंदाच्या वर्षी पाऊस थांबायचं काही नावच घेत नाही आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस बरसत आहे. परतीचा हा पाऊस आणखी किती दिवस कोसळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण या सर्वात आज (3 नोव्हेंबर 2024) पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : Gold Rate on Bhaubij : अरे व्वा! लाडक्या बहिणीसाठी खरेदी करता येणार सोनं? आजचे भाव...

हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना इशारा!

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणीही पाऊस हजेरी लावू शकतो.

ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे, मात्र लवकरच थंडी परतणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : ...म्हणून आम्ही वेगळा पाडवा साजरा करायचा निर्णय घेतला, अजित पवार यांनी सांगितलं कारण

नोव्हेंबर महिना सुरु झाला, पण उकाडा काही गेला नाही. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त आहेत. पण राज्यात लवकरच थंडीची चाहूल लागू शकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडीची चाहूल लागली आहे.

मुंबईत कसं असेल वातावरण?

मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात आज आभाळ कोरडे राहण्याची शक्यत आहे. येथील कमाल तापमानातही घट झाली आहे. 4 नोव्हेंबरपासून राज्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. 
 

    follow whatsapp