Gold-Silver Prices Today : आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यादिनी सोने खरेदी करण्याचा विचार करताय? मग, तुमच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. कारण, कालच्या तुलनेत (बुधवार 14 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही आहे. जरी किंमत तिच असली तरी सोन्याचे हे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत. (gold-silver prices today 15th august gold rate in mumbai pune for 10 gram know the details)
ADVERTISEMENT
Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी (14 ऑगस्ट 2024) सोन्याच्या दरात घसरण झाली. 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याच्या दरात 110 रुपयांनी घसरण झाली. यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 71,620 रुपये प्रति 10 ग्रॅमवरुन 71,510 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांनी घसरण झाली असून 22 कॅरेट सोन्याचा दर 65,650 रुपयांवरुन 65,550 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 53,630 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. त्याच वेळी, एक किलो चांदीचा भाव 83,600 वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आज 15 ऑगस्टनिमित्त ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. कारण, सोन्याच्या या आजच्या भावात कोणताही बदल झालेला नाही आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा संजय राऊतांनी घेतला समाचार, म्हणाले; ""जवानांच्या रक्ताचे सडे..."
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 510 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,630 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 510 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,630 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 510 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,630 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 580 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 540 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,660 रूपये आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: सुट्ट्या जाणार वाया? राज्यात कसा असेल पावसाचा जोर? IMD चा अंदाज
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Independence Day: स्वातंत्र्यदिनी PM मोदींच्या मोठ्या घोषणा! महिला आणि तरूणांसाठी खास काय?
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT