Gold-Silver Price on 31 October 2024 : दिवाळीत सोनं खरेदीला विशेष महत्त्व असून यादिवशी ग्राहक सोन्या-चांदीच्या खरेदीला प्राधान्य देतात. पण गेल्या काही महिन्यांपासून सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं-चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे. चला तर मग आज (31 ऑक्टोबर 2024) सोन्याच्या किंमतीत कोणते बदल झाले आहेत सविस्तर जाणून घेऊया. (gold silver rates on diwali in maharashtra today 31st october 2024 narak chaturdashi Check out 24 22 and 18 carat gold prices)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : ऐन दिवाळीत पावसाचा राडा? आज कुठे काय परिस्थिती?
भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
Good Return on Gold and Silver on Dhanteras: वेबसाईटनुसार, सोमवारी (28 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 81,160 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 170 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 81,330 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 74,400 रूपये होता. त्यातही 150 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 74,550 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 1 लाख रूपयांवर पोहोचला आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हेही वाचा : ladki Bahin Yojana: महिलांनो! खरंच दिवाळी बोनसचे 5500 मिळणार होते? काय आहे नेमकं सत्य?
Gold and Silver Price in your city:तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 74,550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,330 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 61,000 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 74,550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,330 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 61,000 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 74,550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,330 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 61,000 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 74,580 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,360 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 61,030 रूपये आहे.
Difference Between 22 and 24 Carat Gold:22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT